Monday, 13 January 2014

ऑडीओ अथवा विडिओ चॅटींग म्हणजे काय?

ऑडीओ अथवा विडिओ चॅटींग म्हणजे काय?
 सर्वसाधारणपणे चॅटींगच्या प्रोग्रॅममध्ये दोन्ही ठिकाणाहून अक्षरामध्ये आपला संदेश चॅटींगच्या छोट्या चौकोनामध्ये टाईप करुन आपण चॅटींग करीत असतो पण जर आपल्या कॉम्प्युटरला हेडफोन (माईक) अथवा वेबकॅम (कॅमेरा) जोडलेला असेल तर आपण ' ऑडीओ ' अथवा ' विडिओ ' चॅटींग देखिल करु शकतो.
ऑडीओ चॅटींग म्हणजे ज्या चॅटींगमध्ये आपण आपल्या आवाजासोबत चॅटींग करु शकतो. तर विडिओ चॅटींग म्हणजे ज्या चॅटींगमध्ये आपण दुसऱ्याला प्रत्यक्ष कॉम्प्युटरसमोर पाहून चॅटींग करु शकतो. या दोन प्रकारच्या चॅटींगसाठी कुठल्याही एका ठिकाणी अथवा दोन्ही ठिकाणी माईक तसेच वेबकॅम असणे आवश्यक आहे.
आपण जर चॅटींग करीत असाल व जर आपल्या कॉम्प्युटरला हेडफोन म्हणजेच माईक जोडलेला असेल तर आपण समोरच्या व्यक्तीबरोबर आपल्या आवाजामध्य देखिल बोलू शकता साहजिकच यासाठी त्या समोरच्या व्यक्तीच्या कॉम्प्युटरला स्पिकर्स जोडलेले असणे आवश्यक आहे, तरच तो त्या ठिकाणी आपण बोललेल शब्द ऐकू शकतो. तसेच जर आपण चॅटींग करीत असलेल्या कॉम्प्युटरला वेबकॅम म्हणजेच कॅमेरा जोडलेला असेल तर आपण ज्या व्यक्तीशी चॅटींग करीत आहात ती व्यक्ती आपल्याला त्याच्या कॉम्प्युटरच्या स्क्रिनवर पाहू शकते. जर दोन्ही ठिकाणच्या कॉम्प्युटरला वेबकॅम म्हणजेच कॅमेरा जोडलेला असेल तर दोन्ही ठिकाणच्या व्यक्ती चॅटींग करताना एकमेकांना पाहू शकतात.
सध्या ऑडीओ चॅटींगप्रमाणेच विडिओ चॅटींगसाठी देखिल बरेच पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये ' स्काईप ' , ' जी-मेल ' , ' याहू मॅसेंजर ' हे पर्याय भरपूर प्रसिद्ध आहेत.
स्काईप '  हा परदेशातील आपल्या व्यक्तीबरोबर चॅटींगसाठी गेल्या काही वर्षापासून मोठ्याप्रमाणात वापरला जाणार प्रोग्रॅम आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे यामध्ये आपण समोरच्या व्यक्तीबरोबर फोन वर बोलल्याप्रमाणेच त्या व्यक्तीला प्रत्यक्ष समोर पाहता देखिल येते. तर  ' याहू मॅसेंजर ' मध्ये देखिल आपण चॅटींगच्या प्रोग्रॅममध्ये आपण चॅटींगसोबत मायक्रोफोन (माईक) सोबत वेबकॅमेराद्वारे आपण समोरच्या व्यक्तीबरोबर समोरासमोर बोलू देखिल शकतो. नंतरच्या काळामध्ये गूगलने देखिल त्यांच्या जी-मेलमध्ये चॅटींगप्रमाणेच विडिओ चॅटींगची देखिल सोय केली आहे.  त्यासाठी फक्त आपणास आपल्या कॉम्प्युटरमध्ये गूगलच्या वेबसाइटवरुन ' Video and voice plug-in '  प्रोग्रॅम अपडेट करुन घ्यावा लागेल.
आपणास फक्त आपणास ज्या व्यक्तीबरोबर विडिओ चॅटींग करायची असेल त्या व्यक्तीकडे अथवा आपल्याकडे वेबकॅमेरा असल्यास दोन्ही व्यक्ती एकमेकांशी समोरासमोर विडिओ चॅटींग करु शकता.
जर दोघांपैकी एकाकडेच म्हणजे जर आपल्याकडेच वेबकॅमेरा असेल आणि जर समोरच्या व्यक्तीकडे वेबकॅमेरा नसेल तर आपण त्या व्यक्तीशी फक्त बोलू शकतो तर समोरील ती व्यक्ती आपल्याला प्रत्यक्ष वेबकॅमेराद्वारे पाहू शकते.

No comments:

Post a Comment