Monday, 13 January 2014

आपले ई-मेल कसे पहावेत व कसे पाठवावेत?

आपले ई-मेल कसे पहावेत व कसे पाठवावेत?
 आपला ई-मेल ज्या वेबसाइटवर बनविलेला असेल त्यावर वेबसाइटवर व्यवस्थित चुक न करता आपला पूर्ण ई-मेल पत्ता आणि पासवर्ड दिल्यानंतरच साईन इन या बटणावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या ई-मेल खात्यामध्ये प्रवेश मिळतो.
निरनिराळ्या ई-मेल सेवा देणार्‍या वेबसाइटवर ई-मेल पाहण्याची अथवा पाठविण्याची मांडणी थोडीशी निराळी असते पण हा फरक फारच थोडा असतो. सर्व ई-मेलच्या वेबसाइटवर ई-मेल खात्यामध्ये ई-मेलशी संबंधित निरनिराळे विभाग असतात जे त्या वेबसाइटवर पानाच्या डाव्या बाजूला असतात. या विभागांमध्ये प्रामुख्याने Inbox, Sent आणि Composs अथवा Create असे प्रमुख विभाग असतात.
ई-मेल खात्यामध्ये आलेले सर्व ई-मेल इनबॉक्स (Inbox) या विभागामध्ये जमा होतात व पाठविलेले सर्व ई-मेल सेंट (Sent) नावाच्या विभागामध्ये जमा होतात. तसेच आपल्याला जर ई-मेल पाठवायचा असल्यास कंपोज अथवा क्रिएट (Composs अथवा Create) नावाचा विभाग असतो. इनबॉक्स (Inbox) या विभागामधिल आलेल्या कुठल्याही ई-मेलच्या नावावर क्लिक केल्यास तो ई-मेल आपल्यासमोर उघडला जाईल. तसेच तो बंद करण्यासाठी बाजूच्या इनबॉक्स (Inbox) या बटणावर क्लिक करावे.
आपल्याला जर ई-मेल पाठवायचा असेल तर वर सांगितल्याप्रमाणे आपल्या ई-मेल खात्यातील डाव्याबाजूला दिलेल्या Composs अथवा Create लिहिलेल्या बटणावर क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर लगेचच उजव्या बाजूच्या जागेमध्ये आपल्यासमोर ई-मेल पाठविण्याचा विभाग उघडेल. यामध्ये वरील बाजूस ज्याला ई-मेल पाठवायचा आहे त्याच ई-मेल देण्यासाठी टू (To) असे दिले असेल त्याजागेमध्ये आपल्याला ज्याला ई-मेल पाठवायचा असेल ई-मेल पत्ता लिहावा. त्याखालील जागेमध्ये सीसी (Cc) असे दिले असेल त्याजागेमध्ये आपल्याला आपल्या ई-मेलची कॉपी म्हणजेच प्रत दुसऱ्या कुणाला पाठवायची असेल तर त्याचा ई-मेल पत्ता लिहावा. त्याखालील जागेमध्ये आपण आपल्याला आपल्या ई-मेलमध्ये म्हणजेच पत्रामध्ये जे काही लिहायचे असेल ते लिहू शकता, ज्याला ई-मेलची बॉडी असे देखिल म्हणतात. याच विभागामध्ये आपल्याला जर ई-मेल सोबत एक निराळी फाईल पाठवायची असेल तर तशी फाईल जोडण्याची म्हणजेच अटॅच (attachment) करण्याची देखिल सोय असते. शेवटी आपला ई-मेल पुर्ण भरुन झाला की त्याच विभागामध्ये असलेल्या सेंड (Send) या बटणावर क्लिक केल्यास आपला तो ई-मेल दुसर्‍याला पाठविला जातो. पाठविलेला ई-मेल दुसर्‍याला मिळण्यासाठी काही सेकंद ते काही मिनिटे इतका वेळ लागू शकतो.

No comments:

Post a Comment