Monday, 13 January 2014

'लिंक्डईन' - नोकरी आणि व्यवसायाचा मार्गदर्शक


'लिंक्डईन' - नोकरी आणि व्यवसायाचा मार्गदर्शक
 आपण प्रोफेशनल आहात का? या प्रश्नाचे उत्तर 'होय' असे देणे हे साधी गोष्ट नाही. कारण आपण आपल्या कामामध्ये कितीही एक्सपर्ट असलो तरीही स्वतःलाच ' प्रोफेशनल ' म्हणताना बर्‍याच लोकांना अडचण वाटते. एखादा व्यवसाय करणारा  स्वतःला प्रोफेशनल म्हणवून घेतो. पण एखादी व्यक्ती अथवा नुकताच कॉलेज पूर्ण केलेला एखादा मुलगा अथवा मुलगी  स्वतःला प्रोफेशनल बनायला बरीच वर्षे आहेत असे समज मनात बाळगतात.
एखाद्या क्षेत्रामध्ये प्रोफेशनल बनण्यासाठी बरीच वर्षे लागतात हे जरी खरे असले तरी सर्वच प्रोफेशनल असतात असे नाही. त्यामूळे एखाद्याला आपली ओळख करुन देताना आपले शिक्षण आणि इतर कोर्सेसची माहिती एवढेच आपण सांगत असतो. पण नोकरी मिळविण्यासाठी इतके पुरेसे नाही म्हणूनच आपण निरनिराळे आवश्यक कोर्सेस करीत असतो. जेणे करुन आपल्याला चांगल्या ठिकाणी नोकरी मिळावी आणि पगार चांगला असावा. मग इथे परत आपण चांगली नोकरी शोधण्यासाठी पर्याय शोधत असतो, जसे एखाद्याच्या ओळखीने, वर्तमान पत्रातील जाहिरात अथवा इंटरनेटवरील नोकरीचे संकेतस्थळ.
पण आता नोकरी शोधणे आणि मिळविणे पण तितके सोप्पे राहीले नाही आणि नोकरी शोधण्यासाठी मदत करणार्‍या संकेतस्थळांवर देखिल दिवसेंदिवस मोठ्याप्रमाणात भर पडत आहे.
लिंक्डईन ' हे सध्या इंटरनेटवरील वेगाने प्रसिद्ध होत असलेले अजून एक संकेतस्थळ. आपली शिक्षणाची पात्रता तसेच आपली इतर व्यवसायिक माहिती इंटरनेटवर संर्वांना खुले करुन सांगणारे संकेतस्थळ अशी याची ओळख आहे.  नोकरी मिळविण्याच्या तसेच कुशल कामगार शोधण्यासाठी देखिल या 'लिंक्डईन' संकेतस्थळाचा चांगला उपयोग होत आहे.
जवळपास ८० दशलक्षहून अधिक एकमेकांना जोडलेले सभासदांचे नेटवर्क असलेले 'लिंक्डईन' हे संकेतस्थळ विश्वासार्हक ओळखी वाढविण्यासोबत आपली माहिती, कल्पना तसेच नविन संधी एकमेकांना शेअर करण्याचे देखिल कार्य करते.
अगदी मोफत असलेली ही सेवा आपण लगेच वापरु शकता.
  
' लिंक्डईन '  वर आपले खाते उघडण्याबद्दल
 ' लिंक्डईन ' वर आपले खाते उघडणे फारच सोप्पे आहे. यांच्या www.linkedin.com  पहिल्याच पानावर नविन खाते उघडण्यासाठी सोय आहे.
 
 नविन खाते उघडण्यासाठी त्यांच्या वेबसाइट दिलेल्या वरील जागेमध्ये आपले नाव, आडनाव, ई-मेल आणि पासवर्ड देवून ' Join Now ' या बटणावर क्लिक केल्यास पूढे त्यांनी विचारलेली माहिती पूर्ण करीत आपण एकुण ६ टप्पे पार करता तेव्हा आपले खाते उघडले जाते. या ६ टप्प्यामध्ये एखादी माहिती आपण न भरल्यास अथवा काही माहिती नंतर भरली तरी चालते. अशाप्रकारे आपण साधारण ५-१० मिनिटांमध्ये आवश्यक ती माहिती भरुन देखिल आपले खाते उघडू शकता.
 एकदा का आपण लिंक्डईन वर खाते उघडले की नंतर लिंक्डईनच्या वेबसाइटवरील साईन-इन बटणाद्वारे आपण आपल्या खात्यामध्ये प्रवेश करु शकतो.
आपल्या खात्यामध्ये आपण आपल्याला लिंक्डईन वर आलेले ई-मेल, मित्र-मैत्रिणी, इतर कंपन्या, नोकर्‍या इ. बर्‍याच गोष्टी शोधू शकता.
 आपला चालू तसेच मागिल नोकरीची माहिती, नविन ओळखी वाढविणे, आपला ग्रुप तयार करणे, नोकरी शोधणे, कंपन्यांची माहिती शोधणे तसेच प्रश्नांची उत्तरे मिळविणे अशा बर्‍याच उपयोगी गोष्टी इथे उपलब्ध आहेत.व्यवसायिक दृष्टीने तसेच नोकरी शोधण्याच्या तसेच आपल्या कंपनीसाठी कुशल कामगार शोधण्याच्या दृष्टीने 'लिंक्डईन ' फार उपयोगी वेबसाइट आहे.

No comments:

Post a Comment