Monday, 13 January 2014

गुगल प्लस कसे वापराल?

गुगल प्लस कसे वापराल?
 गुगलच्या ऑर्कुटच्या चांगल्या प्रसिद्धी नंतर कालांतराने लोक कंटाळून फेसबूक कडे वळले आणि ऑर्कुटचा वापर कमी झाला. नेमकी हिच गोष्ट लक्षात घेवून गुगलने 'गुगल प्लस ' हि नविन अभिनव उपक्रम सुरु केला आहे. इंटरनेट वापरणार्‍यांच्या सर्व गरजा ओळखून गुगलने हि सेवा सुरु केली आहे.
जुने तसेच नविन मित्रमैत्रिणी शोधणे, त्याच्याशी चॅट करणे, फोटो तसेच विडिओ शेअर करणे, ग्रिटींग पाठविणे, इतरांचे वाढदिवस लक्षात ठेवणे इ. सेवांसोबत या ' गुगल प्लस '  तीन नविन गोष्टी सुरु केल्या आहेत. ज्यामध्ये ' सर्कल (Circles) ' , ' स्पार्क्स (Sparks) ' , ' हॅगआऊट (Hangouts) ' हा नविन सेवा दिल्या आहेत.
  
गुगल प्लसवर आपले खाते कसे उघडाल?
  सध्यातरी गुगल प्लसचे नविन खाते त्यांच्या वेबसाइटवर थेट देण्याची सोय नाही. कारण सध्या प्रायोगिक तत्वावर सुरु केलेली हि सेवा आपणास हवी असल्यास आपणास दुसर्‍याकुणाकडून तरी गुगल प्लसचे निमंत्रण आले असणे आवश्यक आहे. ज्याना असे दुसर्‍याकुणाकडून गुगल प्लसचे निमंत्रण आले असेल तेच हि सेवा वापरु शकता.
टीप : आपणास ' गुगल प्लस ' चे निमंत्रण हवे असल्यास netshika@gmail.com वर संपर्क करावा.

 गुगल प्लसच्या आपल्या खात्यामध्ये पहिल्यापानावर समोरच वरील बाजूस आपल्याला Home,  Photos,  Profile,  Circles  हे विभाग आढळतील.  यामध्ये आपल्या खात्यामध्ये फोटो अपलोड करणे, आपली माहिती भरणे आणि आपल्या खात्यामधिल आपल्या ओळखीच्या लोकांचा समुह (ग्रुप) बनविणे आदी गोष्टी करता येतील. तसेच त्यापुढे ' Find People '  या जागेमध्ये आपण इतरांना गुगल प्लसवर शोधू शकता.

 त्या खालील जागेमध्ये ' Stream ' या विभागात आपण आपल्याला जे काही लिहायचे ते लिहू शकता. यामध्येच आपण फोटो, विडिओ तसेच एखाद्या वेबसाइटची लिंक देवू शकता.

 गुगल प्लसमध्ये आपण आपल्या ओळखीच्या लोकांचा समुह  (ग्रुप) बनवू शकता. यासाठी ' Circles ' असा खास विभाग आहे. यामध्ये आपण नविन लोकांना आपल्या खात्यामध्ये समाविष्ट करु शकता तसेच मित्रमैत्रिणी तसेच ओळखीच्या लोकांनुसार आपण त्यांचा खास समुह बनवू शकता.  ' Circles '  या विभागात आपण ' Add a new person '  द्वारे नविन लोकांना आपल्या खात्यामध्ये जमा करु शकता तसेच त्यांना आपल्याला हव्या त्या  Circle   मध्ये म्हणजेच समुहात जमा करु शकता अथवा त्यांच्यासाठी नविन समुह  तयार करु शकता.

 अशा प्रकारे आपण एखादा समुह तयार केला की नंतर त्या समुहाला म्हणजेच त्या Circle  मधिल लोकांना एकत्रित काही संदेश द्यायचा असल्यास पहिल्या पानावरील डाव्याबाजूच्या विभागात आपल्या फोटोच्या खालीला जागेतील ' Stream ' या जागेमध्ये त्या समुहाच्या नावावर क्लिक करुन त्यांना ' Share what's new ' या जागेमध्ये काही संदेश लिहिल्यास तो संदेश त्या समुहातील सर्वांना पोहोचविला जातो.

 त्याच ' Stream ' या विभागातील ' Incoming ' या विभागात आपण ज्या व्यक्तींच्या समुहामध्ये असाल त्या व्यक्तीने आपण असलेल्या समुहासाठी काही निरोप दिला असल्यास त्याची नोंद दाखविली जाते.
 डावीकडील विभागामध्येच खाली आपल्याला ' Sparks ' असा विभाग आढळेल. यामध्ये आपण आपल्याला आवडीचा विषय दिल्यास/निवडल्यास आणि ' Add interest '  वर क्लिक केल्यास आपण ' Sparks '  य विभागामध्ये आपण दिलेल्या विषयावरील बातम्या आणि लेख वाचू शकतो.

 गुगल प्लसमधिल अजून एक महत्वाचा विभाग म्हणजे ' हॅगआऊट  (Hangouts) ' हा विभाग. यासाठी आपल्या कॉम्प्युटरला ' वेबकॅम (कॅमेरा) ' जोडलेला असणे आवश्यक आहे.  ' हॅगआऊट ' या विभागाद्वारे आपण एकाच वेळी आपल्या विभागातील सर्वांशी वेबकॅमद्वारे थेट समोरासमोर पाहत चॅट करु शकता. यासोबत आपण सर्वांशी विडीओ देखिल शेअर करु शकता.

No comments:

Post a Comment