१. | कुठल्याही अनोळखी ई-मेलला प्रतिउत्तर (Reply) देऊ नका. |
२. | व्हायरस अलर्टचा अनोळखी व्यक्तीकडून आलेला ई-मेल आपल्या मित्रमैत्रीणींना पाठवू (Forward) नका. कारण बर्याच वेळेस अशाच ई-मेल मध्ये व्हायरस असतो. |
३. | आपला पासवर्ड विचारणाऱ्या कुणाच्याही ई-मेलला आपला पासवर्ड ई-मेलद्वारे सांगू नका. |
४. | आपल्या बँकेची अथवा बँक खात्याची माहिती विचारणाऱ्या कुठल्याही ई-मेलला माहिती देऊ नका. तसेच इंटरनेटवर आपल्या बँकेची अथवा बँक खात्याची माहिती देणे शक्यतो टाळा अथवा माहिती द्यायची झाल्यास ती एकाच ई-मेलमध्ये न देता दोन-तीन ई-मेलमध्ये विभागून द्यावी. |
५. | व्हायरसची सुचना देणाऱ्या वेबसाइट पाहू नका… अशा वेबसाइट आपल्या न कळत आपल्या कॉम्प्युटरमधून माहिती चोरत असतात. |
६. | इंटरनेटवरुन कोणतेहे सॉफ्टवेअर डाऊनलोड करताना अथवा एखादे संकेतस्थळ पाहताना जर स्क्रिनवर समोर OK अथवा Cancel असे विचारणारा संदेश असलेला चौकोन आल्यास ती सुचना अथवा संदेश व्यवस्थित वाचून मगच OK अथवा Cancel या बटणावर क्लिक करावे. कारण बर्याच वेळेस अशा अचानक विचारल्या गेलेल्या विंडोद्वारे आपल्या कॉम्प्युटरमध्ये नको असलेले एखादे निराळेच सॉफ्टवेअर अथवा इंटरनेट एक्सप्लोररमध्ये Address Bar च्या खाली त्यांच्या जाहिरातीचे Tool Bar जमा होतात. |
७. | आपण जर आपल्या बँकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन बँकिंग सेवा वापरत असाल तर दर वेळेस न विसरता त्या संकेतस्थळावरुन Sign Out अथवा Log Out केल्या नंतर ब्राऊझरची History (संकेतस्थळ पाहिल्याची नोंद) क्लिअर म्हणजेच नष्ट करावी. |
८. | निरनिराळ्या संकेतस्थळांवर निरनिराळे अनेक युजरआयडी असल्यास बरेच लोक त्या सर्वांना एकच सोयीने लक्षात राहिल असा पासवर्ड देणे पसंत करतात पण अशावेळेस जर आपन आपल्या पासवर्डमध्ये सुरुवातीला अथवा शेवटी # अथवा $ यापैकी कोणताही एक चिन्ह वापल्यास आपला बर्यापैकी सुरक्षित होईल. |
No comments:
Post a Comment