| |||||||||||
शोधाशोध करण्याचा हा त्रास प्रथम गुगल ने तर नंतर त्यापाठोपाठ याहू आणि मायक्रोसॉफ्टने देखिल एक अभिनव योजना सुरु केली ती म्हणजे मॅप ची म्हणजेच नकाशाची. संपूर्ण जगाचा नकाशा असलेल्या या प्रकल्पाने एखाद्या जागेचा ठावठिकाणा शोधणे फारच सोप्पे झाले. महत्त्वाचे म्हणजे या प्रोग्रॅममध्ये पत्ता शोधण्यासाठी सर्चची सोय असल्याने तो प्रोग्रॅममच आपल्याला शोधायला मदत करतो. सध्य गूगल प्रमाणे याहू आणि मायक्रोसॉफ्ट यांचा मॅपचा (नकाशा) प्रोग्रॅम इंटरनेटवर मोफत उपलब्ध आहे. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यास आपण त्यांच्या संकेतस्थळावर जाऊन नकाशा हाताळू शकता.
याच एका अडचणीमूळे नंतर गूगलने 'विकीमॅपिया' www.wikimapia.org हे नविन संकेतस्थळ चालू केले. याद्वारे आपण संपूर्ण पृथ्वीवरील ठिकाणे तर पाहू शकतोच पण त्यासोबत आकाशातून आपल्या घराच्या आजूबाजूची जागा तसेच आपल्या घराचे छप्पर अथवा आपल्या इमारती गच्ची पाहू शकता. इतकेच नाही तर या संकेस्थळाचे वैशिष्ट्य असे की आपण या संकेतस्थळावर आपल्या घराच्या जागे भोवती चौकट करुन तिथे ते आपले घर असल्याची तसेच आपली इतर माहिती देखिल लिहू शकतो आणि ती जगभर सर्वांना दिसू शकते. उदाहरण द्यायचे तर माझेच घ्या नाwww.wikimapia.org हे संकेतस्थळ चालू करा आणि वरील उजव्या बाजूच्या 'सर्च' (search) जागेमध्ये 'Madhav Fulware असे टाईप करुन शोधा आपल्याला लगेच खाली आमच्या इमारतीचे नाव आढळेल आणि त्यावर क्लिक केल्यास आपण थेट आमची इमारत पाहू शकता. इथे मराठीमध्ये देखिल लिहिण्याची सोय आहे. 'बिंग मॅप' नकाशामध्ये आणि 'गूगल मॅप' मध्ये तसे फारसे काही नविन नाही परंतू 'याहू मॅप' पाहिल्यास त्यामध्ये आपल्याला हिंदी भाषेमध्ये देखिल नकाशा पाहता येतो. तसेच या तिन्ही मॅपची म्हणजेच नकाशाची सेवा देणार्या संकेतस्थाळांचे वैशिष्ट्य असे की आपणास इथे मार्गदर्शनाची म्हणजे 'Directions' ची सोय आहे. याद्वारे आपण एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाण्याचा चांगला मार्ग शोधू शकता. |
ALL Readers, या app/blog च्या माध्यमातून मी, Digital India करण्यासाठी ज्या माहितीची गरज आहे, ती माहित आपल्याला आपल्या बोली भाषेत देण्याचा प्रयत्न करतोय... आपल्याला नकीच आवडेन.....
Monday, 13 January 2014
शोधा शोध जागेची इंटरनेटवर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment