Monday, 13 January 2014

मराठीमध्ये ई-मेल कसा लिहावा?

मराठीमध्ये ई-मेल कसा लिहावा?
 आपण जर जीमेल ( Gmail ) चा ई-मेल वापरत असाल तर त्यामध्ये मराठीमध्ये लिहिण्याची सोय आधिच केलेली आहे. ज्याद्वारे आपण थेट आपला ई-मेल मराठीमध्ये लिहू शकता. पण असे जरी असले तरी त्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत.
 
१.आपण जर विंडोज XP   वापरत असाल तर निदान आपला ब्राऊझर नविन असावा म्हणजे जर आपण इंटरनेट एक्सप्लोरर वापरत असाल तर त्याचे व्हर्जन किमान ८ असणे आवश्यक आहे. (आपल्या इंटरनेट एक्सप्लोरर चे व्हर्जन तपासण्यासाठी इंटरनेट एक्सप्लोरर चालू करा आणि वरील मेनूबार मधिल  Help  या विभागातील  About Internet Explorer  वर क्लिक करा. इथे उघडलेल्या छोट्या नविन विंडोमध्ये आपल्याला त्याचा व्हर्जन क्रमांक दिसेल.) आपण जर विंडोज Vista  अथवा विंडोज 7   वापरत असाल तर त्यात इंटरनेट एक्सप्लोरर ८ आधिच आपल्याला मिळेल. पण जर आपल्या कॉम्प्युटरमध्ये इंटरनेट एक्सप्लोररचे ' व्हर्जन ६ ' असेल तर हार्डवेअर इंजिनिअर कडून त्याला अपडेट करुन ' व्हर्जन ८ ' करुन घ्या. आपण जर फायरफॉक्स अथवा क्रोम ब्राऊझर वापरत असाल तर काहीच अडचण नाही.
  
२.खालील चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे आपल्या जी-मेलमधिल वरील उजवीकडील कोपर्‍यातील ' Mail settings '  या विभागावर क्लिक करा.
 
  
३.खालील चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे General  विभागातील Enable Transliteration  विभागामध्ये 'मराठी '  भाषा निवडा आणि त्याच पानावरील सर्वात खाली ' Save Changes '  बटणावर क्लिक करा.
 
  
४.आता. आपण ई-मेल लिहितो त्या    या बटणावर क्लिक करा इथे ई-मेल लिहिण्याच्या जागेच्यावर आपणास खालील चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे मराठीतील  '  '   हे अक्षर आलेले दिसेल त्यावर क्लिक करुन खालील जागेमध्ये इंग्रजीमध्ये लिहिल्यास मराठीमध्ये अक्षरे उमटतील.
 
  
मराठीमध्ये ई-मेल लिहिण्यासाठी दुसरा पर्याय इथे खाली दिला आहे. खालील जागेमध्ये आपण मराठीमध्ये टाईप करु शकता. या जागेमध्ये आपण इंग्रजीमध्ये टाईप करुन स्पेसबार बटण दाबल्यास तिथे मराठी अक्षरे उमटतील. आपणास हवे असलेले मराठी टाईप करुन झाल्यानंतर आपण खाली असलेल्या ' कॉपी करा ' या बटणावर क्लिक करुन वरील आपण टाईप केलेला मराठी मजकूर आपण आपल्या ई-मेलमध्ये पेस्ट करु शकता.
 
मराठी सोबत इंग्रजीमध्ये टाईप करण्यासाठी इथे क्लिक करा. -
 
  
मराठीमध्ये ई-मेल लिहिण्यासाठी तिसरा पर्याय म्हणजे www.marathiemail.net  या वेबसाइट वरुन आपण मराठीमध्ये एखाद्याला ई-मेल पाठवू शकता.

No comments:

Post a Comment