Monday, 13 January 2014

ऑनलाईन शॉपिंग म्हणजे काय?

ऑनलाईन शॉपिंग म्हणजे काय?
 कोणत्याही प्रकारची खरेदी इंटरनेटद्वारे करणे म्हणजेच ऑनलाईन शॉपिंग.प्रत्यक्षात ही शॉपिंग इंटरनेटवरील एखाद्या वेबसाइटच्या मार्फत होते म्हणून आपण असे इंटरनेटद्वारे ऑनलाईन शॉपिंग आपल्या घरामधून, ऑफिसमधून अथवा जगातून कुठूनही करु शकता. पायातील चप्पल खरेदी करण्यापासून कॉम्प्युटर खरेदी करण्यापर्यंत आणि रेल्वेची तिकीटे खरेदी करण्यापासून गाडी विकत घेण्यापर्यंत जवळ-जवळ सर्वच गोष्टी सध्या इंटरनेटवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
निरनिराळ्या वेबसाइटवर ऑनलाईन वस्तू विकणाऱ्या बऱ्याच वेबसाइट आहेत त्यात www.ebay.in,www.shopping.rediff.comwww.shopping.indiatimes.com आणि www.shopping.sify.com इ. काही वेबसाइट भारतामध्ये प्रसिद्ध आहेत.
अशा ऑनलाईन वस्तू विकणाऱ्या वेबसाइटवर उपलब्ध असलेली वस्तू आपण कधीही आणि कितीही वेळा खरेदी करु शकतो. एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर त्या वस्तूचे पैसे देण्याचे बरेच पर्याय सध्या दिलेले असतात. यामध्ये आपण त्या वस्तूचे पैसे ती वस्तू कुरअरने घरी आल्यानंतर देऊ शकता (Cash on Delivery), क्रेडीट कार्ड (Credit Card), डेबिट कार्ड (Debit Card), थेट बँकेतून पैसे ट्रान्सफर (Online Fund Transfer) तसेच चेक (Cheque) इ. निरनिराळ्या प्रकारे करु शकता.
एखाद्या वस्तूची विक्री ही दुकानातून होण्याच्यामानाने इंटरनेटवर त्या वस्तूची विक्री मोठ्या प्रामाणात होते. कारण इंटरनेटद्वारे ती वस्तू जगभरामध्ये पाहिली जात असते, म्हणजेच तीचा अपेक्षित ग्राहक जगभर पसलेला असतो. त्यामूळे इंटरनेटद्वारे त्या वस्तूची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी आणि विक्री होते.
इंटरनेटवरुन आपण एखादी वस्तू खरेदी केली तर काही दिवसांमध्येच ती वस्तू चांगल्या पॅकिंगमध्ये आपल्या घरी पोहोचते याचे कारण ती वस्तू थेट खाऊक दुकानातून आली असल्याने त्यावर इतर खर्च झालेला नसतो, त्यामूळेच अशा ऑनलाईन शॉपिंगवर बर्‍याच प्रमाणात सूट दिलेली असते.
  
 ऑनलाईन शॉपिंगचे फायदे
 
१.जाण्या येण्याचा वेळ वाचतो.
२.बर्‍याच वेळेस एखाद्या वस्तूवर चांगल्याप्रकारे सूट मिळते.
३.वस्तूची उपलब्धता आणि किंमत कळल्याने इतर वस्तूंबरोबर तीची तुलना करता येते.
४.कधीही खरेदी करु शकता कारण इथे वेळेच बंधन नाही.
५.बर्‍याच वेबसाइटवर निरनिराळ्या वस्तूंची खरेदी नंतरचे ती वस्तू खरेदी केलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया दिण्याची सोय असते त्यामूळ आपण खरेदी करत असलेली वस्तू कशी आहे याचा अंदाज येतो.
६.खरेदी केलेल्या वस्तूचे पैसे देण्याचे बरेच सोयीचे पर्याय उपलब्ध असतात.
  
 ऑनलाईन शॉपिंगचे तोटे
 
१.खरेदी केलेली वस्तू आपल्याला ताबडतोब मिळत नाही. ती कुरीअरने येण्यासाठी ३-४ दिवस वाट पहावी लागते.
२.बर्‍याच वेळेस वेबसाइटवर खरेदी केलेली वस्तू आणि नंतर घरी आलेल्या वस्तूमध्ये तफावत असते. याचे कारण नंतर आपली वस्तू उपलब्ध नव्हती असे सांगितले जाते.
३.कुरीअरने आपल्या घरी येई पर्यंत ती सुरक्षित राहण्याची जबाबदारी कोणीच स्विकारत नाही.
४.काहीवेळेस आपली वस्तू आपल्यापर्यंत पोहोचतच नाही व तिची पोच झाली अशी नोंद केलेली असते.
५.प्रत्यक्षात ऑनलाईन शॉपिंगमध्ये सोयीच्या तसेच गैरसोयीच्या बऱ्याच गोष्टी आहेत. असे जरी असले  तरी वाढती मागणी आणि जागृत ग्राहक यामूळे ऑनलाईन शॉपिंगची सुरक्षितता वाढत आहे.

No comments:

Post a Comment