Monday, 13 January 2014

काही इतर उपयोगी सेवा देणारी संकेतस्थळे

काही इतर उपयोगी सेवा देणारी संकेतस्थळे
 संगणकावर काम करताना बर्‍याच गोष्टी करण्यासाठी आपण निरनिराळे सॉफ्टवेअर्स वापरत असतो. परंतू असे जरी असले तरी दरवेळेस एखादी गोष्टी हवी असल्यास त्यासाठी लागणारे आवश्यक सॉफ्टवेअर इंटरनेटवरुन डाऊनलोड करुन आपल्या संगणकामध्ये ' इंस्टॉल ' करुन म्हणजेच लोड करुन त्यानंतर आपले काम करणे शक्य होत नाही. म्हणूनच इंटरनेटवर बरीचशी संकेतस्थळे निरनिराळी ऑनलाईन सेवा देतात म्हणजेच एखादी गोष्ट करण्यासाठी लागणारे सॉफ्टवेअर डाऊनलोड न करता आपण ते काम ऑनलाईन आणि मोफत करु शकतो. अशाच काही आवश्यक कामासाठी लागणार्‍या संकेतस्थळांची यादी खाली दिली आहे.
 
१.PDF फाईल बनविण्यासाठी संकेतस्थळwww.pdfonline.com
२.अनेक PDF फाईलींची एकच फाईल करण्यासाठीwww.mergepdf.net
३.ऑनलाईन गाण्याचा प्रकार बदलण्यासाठी संकेतस्थळwww.mediaconverter.org
४.एखाद्या संकेतस्थळीची PDF फाईल बनविण्यासाठीwww.pdfmyurl.com
५.फाईलचा प्रकार बदलण्यासाठीwww.convertfiles.com
६.फाईलचा प्रकार बदलण्यासाठीwww.zamzar.com
७.इंग्रजी - मराठी शब्दकोश (Dictionary)www.khandbahale.com
८.ऑनलाईन टॅक्स भरण्याचे संकेतस्थळwww.incometaxindiaefiling.gov.in
९.आकाराने मोठ्या फाईल्स पाठविण्यास मदत करणारे संकेतस्थळwww.transferbigfiles.com
१०.गाड्यांच्या क्र. माहिती, फोन क्र., पीनकोडची माहिती मिळते.www.indiatrace.com

No comments:

Post a Comment