Monday, 13 January 2014

मोफत 'एसएमएस' पाठवा !

मोफत 'एसएमएस' पाठवा !
 काही वर्षांपूर्वी एखाद्याला मोबाईल वरुन फोन करणे म्हणजे उगाच एवढे पैसे कशाला घालवा? असा विचार करुन लोक 'एसएमएस' वर काम चालवित होते. कारण 'एसएमएस' हा थोडक्यात आपला संदेश पोहचविणरा आणि चांगले काम करणारा तसेच पैसे वाचविणारा चांगला पर्याय होता.
आज देखिल 'एसएमएस' चे प्रमाण मोबाईल वरुन फोन करण्यापेक्षा कितीतरी पट जास्त आहे. तरुणवर्गाचा 'एसएमएस' हा एक जिवलग मित्र बनला आहे. दिवसातून किमान एकतरी 'एसएमएस' पाठविला नाही असा क्वचितच कॉलेजमध्ये कुणीतरी आढळेल. तसेच फक्त 'एसएमएस' नेच एकमेकांशी गप्पा मारणारे देखिल बरेच आहेत. इंटरनेटवरील चॅटींगप्रमाणे फक्त 'एसएमएस' द्वारे देखिल चॅटींग करणे हा एक नविन छंद बनला आहे. 'एसएमएस' ची हिच वाढलेली गरज ओळखून थोड्या नाही तर बर्‍याच कंपन्यांनी इंटरनेटच्य माध्यमातून मोफत 'एसएमएस' सेवा देण्याचा अभिनव प्रयोग सुरु केला आहे. आपण त्या कंपन्यांच्या संकेतस्थळावरुन मोफत हवे तेवढे 'एसएमएस' भारतात कुठेही आणि कधिही पाठवू शकता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा संकेतस्थळांचा वापरही गेल्या वर्षभरामध्ये मोठ्याप्रमाणात वाढला आहे.
या संकेतस्थळांवर प्रथम आपल्याला आपला मोबाईल क्रमांकाद्वारे 'रजिस्टर'  व्हावे लागते. इथे सुरवातीला 'रजिस्टर'  होताना आपला चालू मोबाईल क्रमांक त्यांना सांगावा लागतो ज्यावर लगेचच त्यांचा 'पासवर्ड' येतो. ज्याद्वारे आपल्याला त्यांच्या संकेतस्थळावर लॉगिन करायचे असते. हा पासवर्ड आपण नंतर बदलू देखिल शकता.
आपण मोबाईल प्रमाणे यामध्ये देखिल आपल्य मित्रमैत्रींचे नाव आणि मोबाईल क्रमांक साठवू शकता. जेव्हा आपण या संकेतस्थळांवरुन एखाद्याला 'एसएमएस'  पाठविता तेव्हा त्याला आपला 'एसएमएस'  जातोच जेव्हा आपण एखाद्या पहिल्यांदा 'एसएमएस'  पाठविता तेव्हा त्याला आपल्या 'एसएमएस'  सोबत आपले नाव व त्या संकेतस्थळाचे नाव असलेला तसेच आपण त्याला आपल्या खात्यामध्ये जमा केल्याचा एक माहितीचा 'एसएमएस'  या संकेतस्थळाद्वारे पाठविला जातो.
या संकेतस्थळांचे महत्त्व म्हणजे मोबाईल प्रमाणे फक्त 'एसएमएस' पाठविणे एवढीच यांचे सेवा मर्यादित नसून आपण एकाचे वेळेस अनेकांना एकच 'एसएमएस' पाठवू शकता. ज्याला 'ग्रुप एसएमएस' असे म्हटले जाते. शिवाय दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर दिनांक आणि वेळ ठरविल्यास त्याच वेळी 'एसएमएस' पाठविला जातो. तसेच आपण पाठविलेल्या सर्व जून्या 'एसएमएस'  ची नोंद देखिल इथे आपल्या खात्यामध्ये साठविली जाते.
फक्त एकच मर्यादा या संकेतस्थळांची आहे ती म्हणजे आपला १४० ते ३०० अक्षरांचा असायला हवा. बस्सा इतकेच.... पण ही १४० ते ३०० अक्षरांची मर्यादा देखिल आता या संकेतस्थळांचा वापर करणार्‍यांना तितकी मोठी वाटत नाही.
या संकेतस्थळांवरुन 'एसएमएस' कसा पाठवायचा ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
 www.world2india.in  - साठी इथे क्लिक करा.
 www.site2sms.com  - साठी इथे क्लिक करा. 
 www.160by2.com  - साठी इथे क्लिक करा. 
 www.way2sms.com  - साठी इथे क्लिक करा.
 www.mysmsworld.com  - साठी इथे क्लिक करा. 
मोफत 'एसएमएस' सेवा देणार्‍या या संकेतस्थळांना मग फायदा कसा होत असेल याचा विचार केल्यास त्याचे उत्तर आपल्याला त्यांच्या संकेतस्थळावर आपले खाते उघडून त्यात प्रवेश केल्यासरशी कळेल हे संकेतस्थळावर आपल्याला निरनिराळ्या जाहिराती पाहायला मिळतील. याच जाहिराती या संकेतस्थळांचे उत्पन्नाचे साधन आहेत. या जहिराती जर निट पाहिल्यास आपल्याला त्यातील तीन जाहिराती 'गूगलच्या' नावाने आढळतील.

No comments:

Post a Comment