| |
तसे पाहता प्रत्येकाच्या मनामध्ये सोप्प्या मार्गाने भरपूर पैसे कमविण्याचा विचार असतो आणि त्यातच एखादाला असा एखादा मार्ग सापडलाच व तेथे आपले पैसे न भरता पैसे कमविण्याची संधी असेल तेव्हा नशिब आपल्यावर खुष असल्याचे प्रत्येकाला वाटते आणि मग न पैसे भरता पैसे कमविण्याच्या मार्गावर तो जातो आणि पैसे न कमविता उलट पैसे गमवून बसतो. जाहिरातींवर क्लिक करा अथवा आमचा संकेतस्थळावरील उत्पादनांसाठी आपले परीक्षण (Review) असलेला फॉर्म भरा आणि पैसे कमवा अथवा आमच्या संकेतस्थळावरुन मोफत एसएमएस पाठवा आणि पैसे कमवा अशी जाहिरात करणारी संकेतस्थळ इंटरनेटवर स्वतःचा भरपूर पैसे कमवित आहेत. काही कंपन्या इंटरनेटवर टाईमपास करणार्या लोकांचा विचार करतात त्यांच्या मते ही लोक वेळेचा गैरवापर करीत असतात. अशा लोकांना त्यांचा फायदा कशामध्ये आहे हे दाखवून उलट त्यांच्याकडून आपलाच फायदा होवू शकतो. तसेही ही लोक इंटरनेटवर टाईमपास करीत असतात तर मग यांना आपण पैसे न भरता इंटरनेटवरच सोप्पे काम दिल्यास आणि त्यातून भरपूर पैसे मिळू शकतील असे आमिष दाखविल्यास ही लोक सहज जाळ्यात अडकतात. इंटरनेटवर निरनिराळ्या संकेतस्थळांवर फिरण्यासाठी माऊसच्या ' क्लिक ' चे फार महत्त्व आहे. प्रत्येक क्लिक हा त्या व्यक्तीने एखाद्या माहितीसाठी केलेला असतो. जाहिरात देणार्या कंपन्याना आपली जाहिरात जास्तीत जास्त लोकांना पहावी असे वाटत असते. परंतू सर्वच लोक जाहिरातींवर क्लिक करीत नाहीत नाही हे देखिल त्यांना माहित असते अशा वेळेस त्या जाहिरात देणार्या कंपन्या आपल्या जाहिरातीची प्रसिद्धी व्हावी यासाठी इतर कंपन्यांना काम देतात आणि याच दुसर्या कंपन्या लोकांचा त्या जाहिरातींवर क्लिक करुन घेण्याच्या दृष्टीने लोकांचा वापर करुन घेतात. जाहिरातींवर क्लिक करणे, फॉर्म भरणे अथवा एसएमएस पाठविणे हा त्या पहिल्या कंपन्यांच्या जाहिरावर क्लिक करावे यासाठीच तयार केलेला एक विशिष्ट प्रोग्रॅम असतो. परंतू लोकांना आकर्षित करण्यासाठी त्यांना या कामातून भरपूर पैसे मिळतील असे सांगितले जाते. यामध्ये प्रत्येक क्लिक करीता काही पैसे ( उदा. ५ पैसे) मिळतील, जर आपण इतरांना आमच्या प्रोग्रॅम समाविष्ट केल्यास ओळख करुन दिल्यास त्यासाठी काही पैसे ( उदा. २५ पैसे) मिळतील आणि जर एका विशिष्ट रक्कमेपर्यंत आपण पोहोचल्यास तेवढे पैसे आपल्याला मिळतील असा हा प्रोग्रॅम असतो. प्रत्यक्षात त्या विशिष्ट रक्कमेपर्यंत पोहोचण्यासाठी आपणास बरेच काम करावे लागते आणि तरीही काही कारणाद्वारे त्या संकेतस्थळाद्वारे आपणास पैसे मिळत नाही. अशाप्रकारे काहीही पैसे न भरता भरपूर पैसे कमविण्याच्या नादामध्ये आपण त्या कंपनीसाठी भरपूर काम करुन दिलेले असते. टीप : महत्त्वाचे म्हणजे या संकेतस्थळांवर कंपनीनी पैसे दिलेल्या बर्याच लोकांची नावे दिलेली असतात परंतू प्रत्यक्षात त्या लोकांचा खोटा पत्ता अथवा फारच छोटा पत्ता दिलेला असतो. उदा. सागर तरे या मुंबईच्या व्यक्तिने रुपये २०००/- कमविले असे दिलेले असते पण आपण हे लक्षात घेत नाही की या सागर तरे नावाच्या व्यक्तिला मुंबईमध्ये शोधायचे कुठे? म्हणजे खरं पाहता खोटी नावे दाखवून कंपनी लोकांची दिशाभूल करीत असते. |
ALL Readers, या app/blog च्या माध्यमातून मी, Digital India करण्यासाठी ज्या माहितीची गरज आहे, ती माहित आपल्याला आपल्या बोली भाषेत देण्याचा प्रयत्न करतोय... आपल्याला नकीच आवडेन.....
Monday, 13 January 2014
जाहिरातींवर क्लिक करा, फॉर्म भरा अथवा एसएमएस पाठवा आणि पैसे कमवा!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment