डाऊनलोड करण्याचा नविन प्रभावी पर्याय - टोरंट | |||||||||||||||||||||||
टोरंटद्वारे आपण सॉफ्टवेअर, गाणी, चित्रपट, विशिष्ट फाईल, गेम्स इ. बर्याचगोष्टी डाऊनलोड करु शकतो. सर्वसाधारणपणे .torrent ही फाईल एखाद्या ठराविक सामुग्रीला टोरंट सर्व्हरद्वारे जोडलेली असते. टोरंटद्वारे एखादी गोष्ट डाऊनलोड करण्यासाठी आपण टोरंट नेटवर्क संकेतस्थळ अथवाटोरंट सॉफ्टवेअरद्वारे डाऊनलोड करु शकता. आपण जेव्हा टोरंटद्वारे एखादी फाईल अथवा एखादे सॉफ्टवेअर डाऊनलोड करता तेव्हा प्रथम आपण टोरंट सर्व्हरला जोडले जाता पण जर सर्व्हरद्वारे आपणास हवी असलेली तीच गोष्ट जर बरेच लोक डाऊनलोड करीत असतील तर म्हणजेच सर्व्हरवर संबंधित डाऊनलोड करणार्यांची संख्या प्रमाणाबाहेर असेल अशावेळी आपली डाऊनलोडची गरज आणि सर्व्हरवरील लोड लक्षात घेउन सर्व्हर आपल्याला लगेच ज्यांनी टोरंट सर्व्हरवरुन आपणास हवी असलेली फाईल आधीच डाऊनलोड केली असेल त्यांना जोडतो व आपली डाऊनलोडींग प्रक्रिया सुरु ठेवतो. आपल्याला हवी असलेली गोष्ट (फाईल) सुरळीत डाऊनलोड करता यावी यासाठी टोरंट सर्व्हर सदैव तत्पर असतो. यामध्ये कोणतीही फाईल थोड्या-थोड्या प्रमाणात अथवा विभागामध्ये डाऊनलोड केली जाते. आपण ज्या टोरंट सर्व्हरवरुन फाईल डाऊनलोड करता त्यावेळी सर्व्हरवर काही अडचणी आल्यास आपणास तो सर्व्हर ज्यांनी आधीच आपण डाऊनलोड करु इच्छित असलेली फाईलचा पुढील भाग आधिच डाऊनलोड केला असेल त्यांना आपल्याला जोडतो व आपले डाऊनलोडींग पूर्ण करतो. अशावेळी आपण देखिल इतरांच्या डाऊनलोडींगला त्याच प्रकारे आपण अर्धवट डाऊनलोड केलेल्या फाईलद्वारे मदत करीत असता. ज्याप्रमाणे सर्व्हर आपली डाऊनलोडींगची गरज इतरांशी जोडून भागवितो त्याच प्रकारे इतरांना देखिल आपण डाऊनलोड केलेल्या फाईल डाऊनलोड करुन देतो. खाली काही टोरंट सर्व्हर आणि टोरंट सॉफ्टवेअरची यादी दिली आहे.
टीप : टोरंटद्वारे आपण डाऊनलोड करीत असलेले सॉफ्टवेअर, गाणी अथवा चित्रपट कायदेशीर आहे का नाही हे पाहणे आपली जबाबदारी आहे. |
ALL Readers, या app/blog च्या माध्यमातून मी, Digital India करण्यासाठी ज्या माहितीची गरज आहे, ती माहित आपल्याला आपल्या बोली भाषेत देण्याचा प्रयत्न करतोय... आपल्याला नकीच आवडेन.....
Monday, 13 January 2014
डाऊनलोड करण्याचा नविन प्रभावी पर्याय - टोरंट
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment