| |
दररोजच्या ई-मेल मध्ये कधीतरी असाही एखादा ई-मेल येतो ज्यामध्ये आपल्याला करोडो रुपयांचे बक्षिस लागल्याचे कळविले जाते. इंटरनेटवरील एका सर्वेक्षणामध्ये झालेल्या लकी-ड्रॉ मध्ये आपला ई-मेल निवडा गेला असून त्याद्वारे आपल्याला जवळजवळ $२१,००,००० (२१ लाख अमेरीकन डॉलर्स म्हणजे ९,२४,००,००० रुपये) रोख रुपयांचे बक्षिस लागल्याचे कळविले जाते. तसेच लवकरात लवकर आपण आमच्य कंपनीशी संपर्क साधावा आणि आपले बक्षिस स्विकारावे असे दिलेले असते. हा ई-मेल पण एका मोठ्या कंपनीच्या नावाने आलेला असतो आणि ज्यामध्ये त्या कंपनीच्या अधिकार्याचे नाव आणि दूरध्वनी क्रमांक देखिल दिलेला असतो. महत्वाचे म्हणजे आपल्या नावानीशी आलेला हा ई-मेल आणि सोबत इवढी भली मोठ्ठी रक्कम बक्षिस आपल्याला लागल्याच्या बातमीवर लगेचच कुणाचाही विश्वास बसतो. अशा वेळेला ई-मेल मध्ये दिलेल्या त्या अधिकार्याला फोन करण्यापेक्षा त्याच्या ई-मेलला प्रतिउत्तर (रिप्लाय) देणेच योग्य वाटते. आपण पैसे आपल्याला कसे आणि कधी मिळतील असे उत्तर देता आणि एक-दोन दिवसांमध्ये त्यांचा उत्तर असलेला अजून एक ई-मेल आपल्याला येतो. या ई-मेल मध्ये आपल्याला आपली ओळख सांगण्याविषयी विचारले जाते, जसे, आपले संपुर्ण नाव, पत्ता, जन्म दिनांक, बँक खाते इ. इ. आपल्याला आलेल्या या त्यांच्या उत्तराने आपल्याला ती कंपनी खरी असल्याची पूर्ण खात्री होते आणि ज्या अर्थी त्यांनी आपल्या बँक खात्याची माहिती विचारली या अर्थी पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होणार असे वाटू लागते. आपण त्यांना पून्हा प्रतिउत्तरामध्ये संपुर्ण माहिती पुरविल्यानंतर २-३ दिवसांनी त्यांचा पुन्हा ई-मेल येतो.. परंतू या ई-मेल मध्ये त्यांनी एक शंका उपस्थित केलेली असते ज्या मध्ये असे सांगितले जाते की आपल्याला हे बक्षिस लागून बरेच आठवडे झाले आहेत आणि आपण आमच्या ई-मेलला लगेच उत्तर न दिल्याने आपले पैसे तुर्तास बँकमध्ये अडकले आहेत. त्याला थोडा कालावधी लागेल, या त्यांच्या उत्तरानंतर आपण काही दिवस त्यांच्या ई-मेलची वाट पाहता, पण त्यांचा ई-मेल येत नाही. मग शेवटी आपणच त्यांन काय स्थिती आहे असे विचारणा ई-मेल पाठविता. आपल्या या उत्तराच्या प्रतिउत्तराचा त्यांचा ई-मेल मग लगेचच येतो. या त्यांच्या उत्तरामध्ये त्यांनी आपले पैसे बँकमध्ये अडकले असल्याचे पून्हा कळविले जाते व ते सोडविण्यासाठी साधारण $१,००० (१ हजार अमेरीकन डॉलर्स म्हणजे जवळपास ४४,००० रुपये) इतक्या रुपयांच्या आवश्यकता आहे असे कळवितात जे त्यांच्य कंपनी भरण्यास तयार नाही आणि जर आपल्याला आपल्या बक्षिसाचे $२१,००,००० हवे असतील तर त्यासाठी बँकेचा $१,००० दंड आपल्याला भरावा लागेल असे सांगितले जाते. तसेच त्यांच्या पत्त्यावर $१,००० चा अमेरीकन चेक पाठविण्यास सांगितले जाते. इथे मग १-२ दिवस विचार केल्या नंतर आपण हाच विचार करता की $२१,००,००० रुपये मिळविण्यासाठी जर $१,००० जात असतील तर त्यात काहीच हरकत नाही आणि आपण कोणताही विचार न करता त्यांना चेक पाठविता आणि त्यांना तसे ई-मेलद्वारे कळविता. परंतू नंतर त्यांचा कोणताही ई-मेल येत नाही. त्यानंतर काही दिवसांनी मग कंटाळून आपण त्यांना त्यांच्या दूरध्वनी वर फोन करता पण तो दूरध्वनी देखिल चुकीचा असल्याचे कळते आणि शेवटी आपल्याला आपण फसविले गेल्याचे समजते परंतू तो पर्यंत बराच वेळ गेलेला असतो आणि आपण काहीच करु शकत नाही हे आपल्याला कळते. लक्षात ठेवा असा ई-मेल आपला फार मोठे नुकसान करु शकतो... आज ना उद्या कधीतरी कधीतरी असा ई-मेल आपल्याला येईल आणि जर आला असेल तर इतर कुणालाही न पाठविता सरळ त्याला डिलीट करुन टाका. |
ALL Readers, या app/blog च्या माध्यमातून मी, Digital India करण्यासाठी ज्या माहितीची गरज आहे, ती माहित आपल्याला आपल्या बोली भाषेत देण्याचा प्रयत्न करतोय... आपल्याला नकीच आवडेन.....
Monday, 13 January 2014
बक्षिस लागल्याचे ई-मेल
जाहिरातींवर क्लिक करा, फॉर्म भरा अथवा एसएमएस पाठवा आणि पैसे कमवा!
| |
तसे पाहता प्रत्येकाच्या मनामध्ये सोप्प्या मार्गाने भरपूर पैसे कमविण्याचा विचार असतो आणि त्यातच एखादाला असा एखादा मार्ग सापडलाच व तेथे आपले पैसे न भरता पैसे कमविण्याची संधी असेल तेव्हा नशिब आपल्यावर खुष असल्याचे प्रत्येकाला वाटते आणि मग न पैसे भरता पैसे कमविण्याच्या मार्गावर तो जातो आणि पैसे न कमविता उलट पैसे गमवून बसतो. जाहिरातींवर क्लिक करा अथवा आमचा संकेतस्थळावरील उत्पादनांसाठी आपले परीक्षण (Review) असलेला फॉर्म भरा आणि पैसे कमवा अथवा आमच्या संकेतस्थळावरुन मोफत एसएमएस पाठवा आणि पैसे कमवा अशी जाहिरात करणारी संकेतस्थळ इंटरनेटवर स्वतःचा भरपूर पैसे कमवित आहेत. काही कंपन्या इंटरनेटवर टाईमपास करणार्या लोकांचा विचार करतात त्यांच्या मते ही लोक वेळेचा गैरवापर करीत असतात. अशा लोकांना त्यांचा फायदा कशामध्ये आहे हे दाखवून उलट त्यांच्याकडून आपलाच फायदा होवू शकतो. तसेही ही लोक इंटरनेटवर टाईमपास करीत असतात तर मग यांना आपण पैसे न भरता इंटरनेटवरच सोप्पे काम दिल्यास आणि त्यातून भरपूर पैसे मिळू शकतील असे आमिष दाखविल्यास ही लोक सहज जाळ्यात अडकतात. इंटरनेटवर निरनिराळ्या संकेतस्थळांवर फिरण्यासाठी माऊसच्या ' क्लिक ' चे फार महत्त्व आहे. प्रत्येक क्लिक हा त्या व्यक्तीने एखाद्या माहितीसाठी केलेला असतो. जाहिरात देणार्या कंपन्याना आपली जाहिरात जास्तीत जास्त लोकांना पहावी असे वाटत असते. परंतू सर्वच लोक जाहिरातींवर क्लिक करीत नाहीत नाही हे देखिल त्यांना माहित असते अशा वेळेस त्या जाहिरात देणार्या कंपन्या आपल्या जाहिरातीची प्रसिद्धी व्हावी यासाठी इतर कंपन्यांना काम देतात आणि याच दुसर्या कंपन्या लोकांचा त्या जाहिरातींवर क्लिक करुन घेण्याच्या दृष्टीने लोकांचा वापर करुन घेतात. जाहिरातींवर क्लिक करणे, फॉर्म भरणे अथवा एसएमएस पाठविणे हा त्या पहिल्या कंपन्यांच्या जाहिरावर क्लिक करावे यासाठीच तयार केलेला एक विशिष्ट प्रोग्रॅम असतो. परंतू लोकांना आकर्षित करण्यासाठी त्यांना या कामातून भरपूर पैसे मिळतील असे सांगितले जाते. यामध्ये प्रत्येक क्लिक करीता काही पैसे ( उदा. ५ पैसे) मिळतील, जर आपण इतरांना आमच्या प्रोग्रॅम समाविष्ट केल्यास ओळख करुन दिल्यास त्यासाठी काही पैसे ( उदा. २५ पैसे) मिळतील आणि जर एका विशिष्ट रक्कमेपर्यंत आपण पोहोचल्यास तेवढे पैसे आपल्याला मिळतील असा हा प्रोग्रॅम असतो. प्रत्यक्षात त्या विशिष्ट रक्कमेपर्यंत पोहोचण्यासाठी आपणास बरेच काम करावे लागते आणि तरीही काही कारणाद्वारे त्या संकेतस्थळाद्वारे आपणास पैसे मिळत नाही. अशाप्रकारे काहीही पैसे न भरता भरपूर पैसे कमविण्याच्या नादामध्ये आपण त्या कंपनीसाठी भरपूर काम करुन दिलेले असते. टीप : महत्त्वाचे म्हणजे या संकेतस्थळांवर कंपनीनी पैसे दिलेल्या बर्याच लोकांची नावे दिलेली असतात परंतू प्रत्यक्षात त्या लोकांचा खोटा पत्ता अथवा फारच छोटा पत्ता दिलेला असतो. उदा. सागर तरे या मुंबईच्या व्यक्तिने रुपये २०००/- कमविले असे दिलेले असते पण आपण हे लक्षात घेत नाही की या सागर तरे नावाच्या व्यक्तिला मुंबईमध्ये शोधायचे कुठे? म्हणजे खरं पाहता खोटी नावे दाखवून कंपनी लोकांची दिशाभूल करीत असते. |
ऑनलाईन जॉब/काम देणारी संकेतस्थळे
| |||||
आपण घरबसल्या इंटरनेटद्वारे ऑनलाईन काम करुन पैसे कमवा तसेच जाहिरातींवर क्लिक करुन महिना हजारो कमवा अशा जाहिराती जर आपण पाहिल्या असतील. फुल टाईम अथवा पार्ट टाईम काम करुन आपल्या घरी काम करुन पैसे कमवा असे सांगणार्या या जाहिराती असतात. इंटरनेटवर दिवसातून काही तास काम करुन आपण काम केल्यास महिन्याला हजारो रुपये मिळू शकतात असे या कंपन्यांचे म्हणणे असते. तसेच दिवसामध्ये कधीही आणि ऑफिस, घरी अथवा सायबरकॅफे असे कुठूनही आपण काम करु शकता. अशी जर जाहिरात आपण पाहिली असल्यास अथवा असा एखादा ई-मेल आपल्याला आला असल्यास सावध रहा कारण पैसे मिळवून देण्या एवजी पैसे लुटण्याचेच काम या कंपन्या करीत असतात. नोकर्यांच्या कमतरतेमूळे अशा कंपन्यांना फसविण्यासाठी बरेच लोक सापडतात. प्रामुख्याने दोन प्रकारची कामे या कंपन्यांद्वारे देण्यात येतात. १) ऑनलाईन जाहिरातींवर क्लिक करण्याचे काम २) घरी बसून पुस्तके टाईप करण्याचे काम
तर दुसर्या प्रकारामध्ये ज्यामध्ये आपल्याला 'डाटा इंट्री' चे काम दिले जाते. यामध्ये आपल्याला काम देण्याआधीच आपल्याकडून नाव नोंदणीच्या नावाखाली काही पैसे घेतले जातात. जे आपल्याला नंतर परत मिळतील असे सांगितले जाते पण प्रत्यक्षात ते मिळत नाहीतच. या कामामध्ये आपल्याकडून महिनाभर भरपूर काम करवून घेऊन सुद्धा आपल्या आपल्या कामाच्या मानाने कमी पैसे दिले जातात. इथे पैसे मिळालेले पाहून आपल्याला त्या कंपनीवर विश्वास बसतो. पण नंतर आपण जसे जसे त्या कंपनीसाठी काम करु लागतो तसे आपले पैसे त्यांच्याकडे जमा होतात पण आपल्याला वेळेवर पैसे दिले जात नाहीत. बरेच महिने काम केल्यानंतर आपण त्यांच्याकडे आपण सुरुवातीला नाव नोंदणीसाठी भरलेले पैसे तेवढे पैसे आपण कमवितो. तेव्हा आपल्या लक्षात येते की इतके महिने काम केले आणि शेवटी आपण आपणच भरलेले पैसे त्या कंपनीकडून कमविले. म्हणजेच इतके महिने आपण अप्रत्यक्षरित्या त्या कंपनीसाठी मोफत काम केले होते. सर्वच नाही पण वर सांगितल्याप्रमाणे १०० पैकी ९५ कंपन्या कामाच्या नावाखाली आपल्या लुटणार्या असतात. याचा अर्थ काही मोजक्या का होईना काम देवून पैसे देणार्या कंपन्यादेखिल आहेत. पण असे असले तरी एखाद्या कंपनीचे काम करण्यापूर्वी त्या कंपनीची चांगली चौकशी करुनच काम करायला सुरुवात करा. |
फसविणारी संकेतस्थळे कशी ओळखावीत?
| |||||||
|
इंटरनेटवर वर काम करताना कुठल्या गोष्टी लक्ष्यात ठेवाव्यात?
| |||||||||||||||||
|
काही इतर उपयोगी सेवा देणारी संकेतस्थळे
| |||||||||||||||||||||||||||||||
संगणकावर काम करताना बर्याच गोष्टी करण्यासाठी आपण निरनिराळे सॉफ्टवेअर्स वापरत असतो. परंतू असे जरी असले तरी दरवेळेस एखादी गोष्टी हवी असल्यास त्यासाठी लागणारे आवश्यक सॉफ्टवेअर इंटरनेटवरुन डाऊनलोड करुन आपल्या संगणकामध्ये ' इंस्टॉल ' करुन म्हणजेच लोड करुन त्यानंतर आपले काम करणे शक्य होत नाही. म्हणूनच इंटरनेटवर बरीचशी संकेतस्थळे निरनिराळी ऑनलाईन सेवा देतात म्हणजेच एखादी गोष्ट करण्यासाठी लागणारे सॉफ्टवेअर डाऊनलोड न करता आपण ते काम ऑनलाईन आणि मोफत करु शकतो. अशाच काही आवश्यक कामासाठी लागणार्या संकेतस्थळांची यादी खाली दिली आहे. | |||||||||||||||||||||||||||||||
|
ऑनलाईन शॉपिंग म्हणजे काय?
| |||||||||||||
निरनिराळ्या वेबसाइटवर ऑनलाईन वस्तू विकणाऱ्या बऱ्याच वेबसाइट आहेत त्यात www.ebay.in,www.shopping.rediff.com, www.shopping.indiatimes.com आणि www.shopping.sify.com इ. काही वेबसाइट भारतामध्ये प्रसिद्ध आहेत. अशा ऑनलाईन वस्तू विकणाऱ्या वेबसाइटवर उपलब्ध असलेली वस्तू आपण कधीही आणि कितीही वेळा खरेदी करु शकतो. एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर त्या वस्तूचे पैसे देण्याचे बरेच पर्याय सध्या दिलेले असतात. यामध्ये आपण त्या वस्तूचे पैसे ती वस्तू कुरअरने घरी आल्यानंतर देऊ शकता (Cash on Delivery), क्रेडीट कार्ड (Credit Card), डेबिट कार्ड (Debit Card), थेट बँकेतून पैसे ट्रान्सफर (Online Fund Transfer) तसेच चेक (Cheque) इ. निरनिराळ्या प्रकारे करु शकता. एखाद्या वस्तूची विक्री ही दुकानातून होण्याच्यामानाने इंटरनेटवर त्या वस्तूची विक्री मोठ्या प्रामाणात होते. कारण इंटरनेटद्वारे ती वस्तू जगभरामध्ये पाहिली जात असते, म्हणजेच तीचा अपेक्षित ग्राहक जगभर पसलेला असतो. त्यामूळे इंटरनेटद्वारे त्या वस्तूची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी आणि विक्री होते. इंटरनेटवरुन आपण एखादी वस्तू खरेदी केली तर काही दिवसांमध्येच ती वस्तू चांगल्या पॅकिंगमध्ये आपल्या घरी पोहोचते याचे कारण ती वस्तू थेट खाऊक दुकानातून आली असल्याने त्यावर इतर खर्च झालेला नसतो, त्यामूळेच अशा ऑनलाईन शॉपिंगवर बर्याच प्रमाणात सूट दिलेली असते. | |||||||||||||
ऑनलाईन शॉपिंगचे फायदे | |||||||||||||
| |||||||||||||
ऑनलाईन शॉपिंगचे तोटे | |||||||||||||
|
ऑनलाईन बँकिंग म्हणजे काय?
| |||||||||||||||
सर्वसाधारणपणे प्रत्यक्ष बँकेमध्ये जाऊन होणारी जवळजवळ सर्वच कामे सध्या ऑनलाईन बँकिंगद्वारे शक्य झाली आहेत. जसे आपले खात्याची माहिती घेणे, शिल्लक रक्कमेची चौकशी, बिल भरणा, पैसे दुसऱ्यांना पाठविणे, पेमेंट थांबविणे, तसेच ऑनलाईन कर्ज (लोन) अथवा क्रेडीट कार्डाची मागणी करणे इ. त्यामूळे हे ऑनलाईन बँकिंग फार सोईचे होऊ लागले आहे. टेलिफोनचे बिल, विजेचे बिल, गॅसचे बिल या छोट्या गोष्टी देखिल आता ऑनलाईन बँकिंगद्वारे सहज शक्य आहे. आपण घर बसल्या वेळीच सर्व बिले भरु शकता. तसेच यामध्ये असलेल्या ऑटो बिल पेमेंटद्वारे तर आपल्याला लक्षात ठेवून बिल भरण्याची देखिल गरज नाही, कारण महिन्याच्या बिलाची तारीख आली की वेळीच आपले बिल आपल्या बँक खात्यामधून भरले जाते आणि यासाठी आपल्याला कुठलेही अधिक पैसे द्यावे लागत नाहीत. | |||||||||||||||
ऑनलाईन बँकिंगचे फायदे | |||||||||||||||
| |||||||||||||||
ऑनलाईन बँकिंगचे तोटे | |||||||||||||||
| |||||||||||||||
प्रत्यक्षात पाहता ऑनलाईन बँकिंगचे तोटे फारच शुल्लक असल्याने ऑनलाईन बँकिंग खरंतर आपल्यासाठी फायदेशीर असल्याचे दिसून येते. ऑनलाईन बँकिंगविषयी अधिक माहिती त्या-त्या बँकेमध्ये मोफत दिली जाते. तसेच ही सेवा अगदी मोफत असते. तर बऱ्याच बँका आता जर त्यांच्या एखाद्या ऑनलाईन बँकिंग खात्याचा गैरवापर झाल्यास त्याची जबाबदारी स्विकारतात. |
यु-ट्युब वर आपला विडिओ अपलोड अथवा डाऊनलोड कसा कराल?
| |||||||||
यु-ट्युबच्या वेबसाइटवर आपला विडिओ अपलोड कसा कराल? | |||||||||
यु-ट्युबच्या संकेतस्थळावर आपण आपल्या खात्यामध्ये लॉगिन केले की वरील बाजूस आपल्याला ' अपलोड ' अशी लिंक दिसेल त्यावर क्लिक करा. आता समोर येणार्या पानावर समोर आपल्याला ' ब्राऊझ ' असे बटण दिसेल त्यावर क्लिक करुन आपला विडिओ इथे जोडून - ओके बटणावर क्लिक केल्यास लगेचच आपला विडिओ आपल्या खात्यामध्ये अपलोड व्हायला सुरुवात होते. हा विडिओ अपलोड होत असतानाच आपण खालील जागेमध्ये त्या विडिओ बद्दलची अधिक माहिती जसे त्या विडिओचे शिर्षक, त्या विडिओबद्दलची थोडक्यात माहिती म्हणेज विषय, दिनांक व मजकूर टाकू शकता. | |||||||||
यु-ट्युबच्या वेबसाइटवर आपला विडिओ डाऊनलोड कसा कराल? | |||||||||
यु-ट्युबच्या संकेतस्थळावरुन विडिओ आपल्या कॉम्प्युटरमध्ये उतरवून घेण्याला ' डाऊनलोड ' करणे असे म्हणतात. पण प्रत्यक्षात यु ट्युबच्या संकेतस्थळावर त्यांचे विडिओ 'डाऊनलोड' करुन घेण्यासाठी सध्यातरी कोणतीही व्यवस्था केलेली नाही. यामुळेच आपल्याला जर यु-ट्युबच्या संकेतस्थळावरुन विडिओ डाऊनलोड करुन घ्यायचे असल्यास इतर उपलब्ध पर्यायांची मदत घ्यावी लागते. | |||||||||
यु-ट्युबवरील विडिओ डाऊनलोड करण्याचे पर्याय | |||||||||
१. काही सॉफ्टवेअर द्वारे डाऊनलोड - अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा. | |||||||||
२. काही संकेतस्थळावरुन ऑनलाईन डाऊनलोड - अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा. | |||||||||
३. यु-ट्युबच्या संकेतस्थळावरुन विडिओ आपल्या मोबाईलमध्ये कसा घ्याल ? - अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा. | |||||||||
गुगल.कॉम वर ' youtube video downloader ' असे सर्च केल्यास आपणास यु-ट्युबवरुन विडीओ डाऊनलोड करण्यासाठी बरेच सॉफ्टवेअर्स सापडतील. इथे खाली त्यातीलच एक सॉफ्टवेअर सुचविले आहे. तसेच ते डाऊनलोड करण्याची लिंक देखिल दिली आहे.
( टीप : सॉफ्टवेअर इंस्टॉलेशन तुम्हाला माहित असेलच, नसल्यास कुणालातरी विचारा आणि शेवटी मला फोन करा. )
| |||||||||
गुगल.कॉमवर 'Youtube Video Download Online' असे शोधल्यास सध्या बर्याचे संकेतस्थळ उपलब्ध झाले आहेत. यातील काही उपयुक्त संकेस्थळांची यादी खाली दिली आहे.
टीप : या संकेतस्थळांवरुन विडिओ डाऊनलोड करण्याआधी आपल्या कॉम्प्युटरमध्ये 'जावा' हा मोफत सॉफ्टवेअर लोड करणे आवश्यक आहे. 'जावा' चा सॉफ्टवेअर आपण www.java.com या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करु शकता. आपल्या कॉम्प्युटरमध्ये जर आधीपासूनच 'जावा' चा सॉफ्टवेअर टाकलेला असेल तर तशाप्रकारचा संदेश आपल्याला समोर दिसेल. तसेच वर सांगितलेल्या संकेतस्थळांवरुन विडिओ डाऊनलोड करताना पहिल्यावेळेस अथवा नेहमीच ' Always trust content from this publisher. ' अशी अजून एक सुचना विचारली जाईल. ज्याचा अर्थ आपण या संकेतस्थळावर विश्वास ठेवत आहात ना! पण वर सांगितलेला ' जावा ' चा सॉफ्टवेअर आणि नंतरची ' विश्वासाची ' सुचना दरवेळेस त्रास देणार नाहीत. | |||||||||
विशेष सुचना - ऑनलाईन एखाद्या वेबसाइटवरुन यु-ट्युबचे विडीओ डाऊनलोड करताना बर्याच अशा जाहिरातीदेखिल समोर येतात ज्यावर ' डाऊनलोड ' व ' प्ले नाऊ ' असे लिहिलेले आढळेल. त्यावर चुकूनही क्लिक करु नका. या जाहिराती आहेत. त्यावर क्लिक केल्याने आपण नको तिकडे भरकटर रहाल आणि विडीओ डाऊनलोड करायचे बाजूलाच राहून जाईल. अशी एक जाहिरात खाली दाखविली आहे. |
मोफत 'एसएमएस' पाठवा !
| |||||||||||
काही वर्षांपूर्वी एखाद्याला मोबाईल वरुन फोन करणे म्हणजे उगाच एवढे पैसे कशाला घालवा? असा विचार करुन लोक 'एसएमएस' वर काम चालवित होते. कारण 'एसएमएस' हा थोडक्यात आपला संदेश पोहचविणरा आणि चांगले काम करणारा तसेच पैसे वाचविणारा चांगला पर्याय होता. आज देखिल 'एसएमएस' चे प्रमाण मोबाईल वरुन फोन करण्यापेक्षा कितीतरी पट जास्त आहे. तरुणवर्गाचा 'एसएमएस' हा एक जिवलग मित्र बनला आहे. दिवसातून किमान एकतरी 'एसएमएस' पाठविला नाही असा क्वचितच कॉलेजमध्ये कुणीतरी आढळेल. तसेच फक्त 'एसएमएस' नेच एकमेकांशी गप्पा मारणारे देखिल बरेच आहेत. इंटरनेटवरील चॅटींगप्रमाणे फक्त 'एसएमएस' द्वारे देखिल चॅटींग करणे हा एक नविन छंद बनला आहे. 'एसएमएस' ची हिच वाढलेली गरज ओळखून थोड्या नाही तर बर्याच कंपन्यांनी इंटरनेटच्य माध्यमातून मोफत 'एसएमएस' सेवा देण्याचा अभिनव प्रयोग सुरु केला आहे. आपण त्या कंपन्यांच्या संकेतस्थळावरुन मोफत हवे तेवढे 'एसएमएस' भारतात कुठेही आणि कधिही पाठवू शकता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा संकेतस्थळांचा वापरही गेल्या वर्षभरामध्ये मोठ्याप्रमाणात वाढला आहे. या संकेतस्थळांवर प्रथम आपल्याला आपला मोबाईल क्रमांकाद्वारे 'रजिस्टर' व्हावे लागते. इथे सुरवातीला 'रजिस्टर' होताना आपला चालू मोबाईल क्रमांक त्यांना सांगावा लागतो ज्यावर लगेचच त्यांचा 'पासवर्ड' येतो. ज्याद्वारे आपल्याला त्यांच्या संकेतस्थळावर लॉगिन करायचे असते. हा पासवर्ड आपण नंतर बदलू देखिल शकता. आपण मोबाईल प्रमाणे यामध्ये देखिल आपल्य मित्रमैत्रींचे नाव आणि मोबाईल क्रमांक साठवू शकता. जेव्हा आपण या संकेतस्थळांवरुन एखाद्याला 'एसएमएस' पाठविता तेव्हा त्याला आपला 'एसएमएस' जातोच जेव्हा आपण एखाद्या पहिल्यांदा 'एसएमएस' पाठविता तेव्हा त्याला आपल्या 'एसएमएस' सोबत आपले नाव व त्या संकेतस्थळाचे नाव असलेला तसेच आपण त्याला आपल्या खात्यामध्ये जमा केल्याचा एक माहितीचा 'एसएमएस' या संकेतस्थळाद्वारे पाठविला जातो. या संकेतस्थळांचे महत्त्व म्हणजे मोबाईल प्रमाणे फक्त 'एसएमएस' पाठविणे एवढीच यांचे सेवा मर्यादित नसून आपण एकाचे वेळेस अनेकांना एकच 'एसएमएस' पाठवू शकता. ज्याला 'ग्रुप एसएमएस' असे म्हटले जाते. शिवाय दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर दिनांक आणि वेळ ठरविल्यास त्याच वेळी 'एसएमएस' पाठविला जातो. तसेच आपण पाठविलेल्या सर्व जून्या 'एसएमएस' ची नोंद देखिल इथे आपल्या खात्यामध्ये साठविली जाते. फक्त एकच मर्यादा या संकेतस्थळांची आहे ती म्हणजे आपला १४० ते ३०० अक्षरांचा असायला हवा. बस्सा इतकेच.... पण ही १४० ते ३०० अक्षरांची मर्यादा देखिल आता या संकेतस्थळांचा वापर करणार्यांना तितकी मोठी वाटत नाही. या संकेतस्थळांवरुन 'एसएमएस' कसा पाठवायचा ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
|
ऑनलाईन मराठी शुभेच्छापत्र पाठवा !
| |||||||||
जवळ जवळ सर्वच क्षेत्रातील माहिती सांगणारी संकेतस्थळे निर्माण झाली आहेत आहे आणि मराठी संकेतस्थळांची संख्या देखिल वाढत चालली आहे. या वाढणार्या निरनिराळ्या विषयांमध्ये करमणूकी वरील मराठी संकेतस्थळे बरीच आहेत. वाढत्या कामाच्या व्यापामूळे दिवसेंदिवस आयुष्य अधिक गतिमान होवू लागले आहे. पूर्वीप्रमाणे एकमेकांशी मित्रमैत्रीणींशी गाठीभेटी होणे कमी होवू लागले आहे. सांस्कृतिक सणांना होणारी सर्वांची गर्दी कमी होवू लागली आहे. यामध्ये करमणूकी वरील मराठी संकेतस्थळे नाते संबंध जवळ आणण्यास बरीच मदत करतात. त्यातीलच एक भाग म्हणजे सणासुदीच्या दिवशी मराठी संकेतस्थळावरुन पाठविले जाणारी शुभेच्छापत्रे. शुभेच्छापत्रे आपल्या मित्रमैत्रीणीं लक्षात ठेवण्याचे एक चांगले साधन आहे. यामूळे सणासूदीच्या आपल्या जून्या आठवणींना देखिल उजाळा मिळतो. अशाच काही मराठीमध्ये शुभेच्छापत्रे पाठविण्याची मोफत सेवा देणार्या संकेतस्थळाची यादी खाली दिली आहे. | |||||||||
|
ऑडीओ अथवा विडिओ चॅटींग म्हणजे काय?
| |
ऑडीओ चॅटींग म्हणजे ज्या चॅटींगमध्ये आपण आपल्या आवाजासोबत चॅटींग करु शकतो. तर विडिओ चॅटींग म्हणजे ज्या चॅटींगमध्ये आपण दुसऱ्याला प्रत्यक्ष कॉम्प्युटरसमोर पाहून चॅटींग करु शकतो. या दोन प्रकारच्या चॅटींगसाठी कुठल्याही एका ठिकाणी अथवा दोन्ही ठिकाणी माईक तसेच वेबकॅम असणे आवश्यक आहे. आपण जर चॅटींग करीत असाल व जर आपल्या कॉम्प्युटरला हेडफोन म्हणजेच माईक जोडलेला असेल तर आपण समोरच्या व्यक्तीबरोबर आपल्या आवाजामध्य देखिल बोलू शकता साहजिकच यासाठी त्या समोरच्या व्यक्तीच्या कॉम्प्युटरला स्पिकर्स जोडलेले असणे आवश्यक आहे, तरच तो त्या ठिकाणी आपण बोललेल शब्द ऐकू शकतो. तसेच जर आपण चॅटींग करीत असलेल्या कॉम्प्युटरला वेबकॅम म्हणजेच कॅमेरा जोडलेला असेल तर आपण ज्या व्यक्तीशी चॅटींग करीत आहात ती व्यक्ती आपल्याला त्याच्या कॉम्प्युटरच्या स्क्रिनवर पाहू शकते. जर दोन्ही ठिकाणच्या कॉम्प्युटरला वेबकॅम म्हणजेच कॅमेरा जोडलेला असेल तर दोन्ही ठिकाणच्या व्यक्ती चॅटींग करताना एकमेकांना पाहू शकतात. सध्या ऑडीओ चॅटींगप्रमाणेच विडिओ चॅटींगसाठी देखिल बरेच पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये ' स्काईप ' , ' जी-मेल ' , ' याहू मॅसेंजर ' हे पर्याय भरपूर प्रसिद्ध आहेत. ' स्काईप ' हा परदेशातील आपल्या व्यक्तीबरोबर चॅटींगसाठी गेल्या काही वर्षापासून मोठ्याप्रमाणात वापरला जाणार प्रोग्रॅम आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे यामध्ये आपण समोरच्या व्यक्तीबरोबर फोन वर बोलल्याप्रमाणेच त्या व्यक्तीला प्रत्यक्ष समोर पाहता देखिल येते. तर ' याहू मॅसेंजर ' मध्ये देखिल आपण चॅटींगच्या प्रोग्रॅममध्ये आपण चॅटींगसोबत मायक्रोफोन (माईक) सोबत वेबकॅमेराद्वारे आपण समोरच्या व्यक्तीबरोबर समोरासमोर बोलू देखिल शकतो. नंतरच्या काळामध्ये गूगलने देखिल त्यांच्या जी-मेलमध्ये चॅटींगप्रमाणेच विडिओ चॅटींगची देखिल सोय केली आहे. त्यासाठी फक्त आपणास आपल्या कॉम्प्युटरमध्ये गूगलच्या वेबसाइटवरुन ' Video and voice plug-in ' प्रोग्रॅम अपडेट करुन घ्यावा लागेल. आपणास फक्त आपणास ज्या व्यक्तीबरोबर विडिओ चॅटींग करायची असेल त्या व्यक्तीकडे अथवा आपल्याकडे वेबकॅमेरा असल्यास दोन्ही व्यक्ती एकमेकांशी समोरासमोर विडिओ चॅटींग करु शकता. जर दोघांपैकी एकाकडेच म्हणजे जर आपल्याकडेच वेबकॅमेरा असेल आणि जर समोरच्या व्यक्तीकडे वेबकॅमेरा नसेल तर आपण त्या व्यक्तीशी फक्त बोलू शकतो तर समोरील ती व्यक्ती आपल्याला प्रत्यक्ष वेबकॅमेराद्वारे पाहू शकते. |
चॅटींग म्हणजे काय आणि ते कसे करावे?
| |
सध्या चॅटींगचा प्रोग्रॅम बऱ्याच वेबसाइट पुरवितात. त्यामूळे आपल्याला जर एखाद्या व्यक्तीशी करायची असेल तर दोन्ही ठिकाणी सारखाच चॅटींगचा प्रोग्रॅम असणे आवश्यक आहे. याहू.कॉमचा याहू मॅसेंजर (Yahoo Messenger) तर गूगल.कॉमचा जी-टॉक (GTalk) हे दोन चॅटींगचे प्रोग्रॅम जगप्रसिद्ध आहेत. या दोन्ही प्रोग्रॅमद्वारे चॅटींग करण्यासाठी आपल्याला त्यांच्या वेबसाइटवर प्रथम मोफत ई-मेल खाते उघडावे लागेल. जर आपला अधीच याहू.कॉमवर ई-मेल असेल तर आपण त्याद्वारे याहू मॅसेंजर अथवा जीमेल.कॉमवर ई-मेल असेल तर आपण त्याद्वारे जी-टॉकवर चॅटींग करु शकता. आपल्याला जर आपल्या एखाद्या मित्रमैत्रीणीशी चॅटींग करायची असेल तर प्रथम वर सांगितल्याप्रमाणे दोन्ही ठिकाणच्या कॉम्प्युटवर याहू मॅसेंजर अथवा जी-टॉक यापैकी एखादा सारखाच प्रोग्रॅम लोड करुन घ्यावा लागेल. गूगल.कॉमचा जी-टॉक डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. - google.com/talk याहू.कॉमचा याहू मॅसेंजर डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. - messenger.yahoo.com खाली दाखविल्याप्रमाणे मग त्या प्रोग्रॅममध्ये आपल्या ई-मेलद्वारे लॉगिन करावी लागेल. आपल्या ई-मेलचा योग्य युजरआयडी आणि पासवर्ड दिल्यानंतर चॅटींगचा प्रोग्रॅम आपल्या समोर सुरु होईल. एकदा का आपण या दोन्हीपैकी एखादा प्रोग्रॅम आपल्या कॉम्प्युटरमध्ये लोड केला की नंतर दरवेळेस कॉम्प्युटर सुरु केल्याबरोबर अपोआप सुरु होतो आपणास जर तो प्रोग्रॅम वापरायचा असेल तर त्या प्रोग्रॅममध्ये आपल्या ई-मेलद्वारे लॉगिन करावी लागेल. आपल्या ई-मेलचा योग्य युजरआयडी आणि पासवर्ड दिल्यानंतर चॅटींगचा प्रोग्रॅम आपल्या समोर सुरु होईल. जर आपण प्रथमच चॅटींग करीत असाल तर खाली दाखविल्याप्रमाणे सर्वप्रथम आपल्याला आपल्या त्या मित्र अथवा मैत्रीणीचा ई-मेल आयडी त्या चॅटींगच्या प्रोग्रॅममध्ये जमा करावा लागेल. अशाप्रकारे एखाद्य व्यक्तीला त्या प्रोग्रॅममध्ये जमा करण्यासाठी त्यामध्ये ' + ADD ' च्या बटणाची सोय आहे. आपण जर जी-टॉक वापरत असाल तर आपल्या त्याला चॅटींगच्या प्रोग्रॅममध्ये जमा करताना त्याचा ई-मेल आयडी जी-मेलचाच असायला हवा तसेच जर आपण याहू मॅसेंजर वापरत असाल तर त्यासाठी आपला व आपल्या मित्र अथवा मैत्रीणीचा ई-मेल आयडी देखिल याहूचाच असणे आवश्यक आहे. आपल्या चॅटींगच्या प्रोग्रॅममध्ये आपल्याला हवे तेवढे मित्र अथवा मैत्रीणी जमा करु शकता. परंतू चॅटींग करण्यासाठी आपल्या प्रमाणेच आपल्याला ज्याच्याबरोबर चॅटींग करायची असेल तो देखिल त्यावेळी आपल्याप्रमाणेच दुसरीकडे सारखाच चॅटींगचा प्रोग्रॅम वापरत असायला हवा. या चॅटींगच्या प्रोग्रॅममध्ये आपण जमा केलेल्या मित्र अथवा मैत्रीणीपैकी आपल्याप्रमाणेच इतर कुणी त्यावेळी ऑनलाईन असल्यास तसे त्यामध्ये सुचित देखिल केले जात. मग आपण त्याच्या नावावर डबल-क्लिक करुन उघडणार्या छोट्या चौकोनात त्याला एखादे वाक्य लिहिल्यास लगेचच आपला संदेश आपल्या मित्र अथवा मैत्रीणीच्या कॉम्प्युटरवर छोट्या चौकोनामध्ये दिसू लागेल. मग त्याच छोट्या चौकोनामध्ये खाली त्या दुसऱ्या व्यक्तीला आपल्याला प्रतिउत्तर देता येईल. अशा प्रकारे आपण त्या छोट्या चौकोनामध्ये टाईप करुन गप्पागोष्टी करु शकता. यालाच चॅटींग असे म्हणतात. |
ट्विटर - आपल्याला हवे ते बोला !
| |
अशाच प्रकारचे इंटरनेटवरील बोलण्याचे प्रत्येकाच स्वतःचे व्यासपिठ म्हणजे ट्विटर. ट्विटर हा देखिल सोशल नेटवर्किंग व मायक्रो-ब्लॉगिंगचाच एक प्रकार. म्हणजेच कोणताही आर्थिक हेतू नसलेली स्वतःचे मोफत व्यासपिठ देणारे लहान प्रकारची एक नोंदवही. ट्विटर हा चिवचिवाट करणार्या एका पक्षाचे नाव, जसे आपल्या इथे सतत चिवचिवाट करणारी चिमणी. जशी चिमणीची चिवचिव सतत चालू असते आणि तिला कुणीही थांबवू शकत नाही. त्याच प्रमाणे आपण ट्विटरच्या संकेतस्थळावर आपल्याला हवे ते लिहू शकतो. काहीही लिहिण्याची मुभा इथे जरी असली तरी लिहिण्याची मर्यादा फक्त १४० अक्षरांचीच आहे. म्हणजे आपण आपल्याला हवे ते लिहा पण फक्त अक्षरांमध्येच. जशी मर्यादा आपल्या मोबाईलच्या एसएमएस मध्ये असते तशी. इथे आपण आपला संदेश सर्वांसाठी खुला अथवा अथवा फक्त आपल्या मित्रमैत्रीणींनाच वाचता येईल अशी सोय आहे. असे करताना आपण आपली माहिती इथे गुप्त देखिल ठेवू शकतो. ट्विटरवर 'फॉलोवर्स' हा एक प्रभावी उपक्रम आहे. म्हणजे आपण ट्विटरवर आपले खाते उघडल्यानंतर आपल्या खात्याचे जेवढे 'फॉलोवर्स' असतील त्यांना आपण ट्विटरवर केलेल्या चिवचिवाटाची म्हणजेच लिहिलेल्या संदेशाची प्रत आपोआप मिळते या 'फॉलोवर्स' नाच आपण आपली पाठपुरवठा करणारे म्हणू शकतो. जे आपल्या संदेशांमध्ये रस असेल. ट्विटर वर काहिही लिहिण्यासाठी प्रथम आपल्याला तेथे त्यांच्या संकेतस्थळावर प्रवेश (म्हणजेच साईन-इन) करावे लागेल, जर आपण ट्विटर वर आपले खाते या आधी उघडले नसेल तर आपले नविन खाते उघडावे लागेल. ट्विटर वर नविन खाते उघडण्यासाठी फक्त इतकेच करायचे आहे की त्यांच्या www.twitter.com संकेतस्थळ चालू करा. आता उजव्या बाजूच्या जागेतील साईन-अप ( Sign Up ) या बटणावर क्लिक करा. |
'लिंक्डईन' - नोकरी आणि व्यवसायाचा मार्गदर्शक
| |
एखाद्या क्षेत्रामध्ये प्रोफेशनल बनण्यासाठी बरीच वर्षे लागतात हे जरी खरे असले तरी सर्वच प्रोफेशनल असतात असे नाही. त्यामूळे एखाद्याला आपली ओळख करुन देताना आपले शिक्षण आणि इतर कोर्सेसची माहिती एवढेच आपण सांगत असतो. पण नोकरी मिळविण्यासाठी इतके पुरेसे नाही म्हणूनच आपण निरनिराळे आवश्यक कोर्सेस करीत असतो. जेणे करुन आपल्याला चांगल्या ठिकाणी नोकरी मिळावी आणि पगार चांगला असावा. मग इथे परत आपण चांगली नोकरी शोधण्यासाठी पर्याय शोधत असतो, जसे एखाद्याच्या ओळखीने, वर्तमान पत्रातील जाहिरात अथवा इंटरनेटवरील नोकरीचे संकेतस्थळ. पण आता नोकरी शोधणे आणि मिळविणे पण तितके सोप्पे राहीले नाही आणि नोकरी शोधण्यासाठी मदत करणार्या संकेतस्थळांवर देखिल दिवसेंदिवस मोठ्याप्रमाणात भर पडत आहे. ' लिंक्डईन ' हे सध्या इंटरनेटवरील वेगाने प्रसिद्ध होत असलेले अजून एक संकेतस्थळ. आपली शिक्षणाची पात्रता तसेच आपली इतर व्यवसायिक माहिती इंटरनेटवर संर्वांना खुले करुन सांगणारे संकेतस्थळ अशी याची ओळख आहे. नोकरी मिळविण्याच्या तसेच कुशल कामगार शोधण्यासाठी देखिल या 'लिंक्डईन' संकेतस्थळाचा चांगला उपयोग होत आहे. जवळपास ८० दशलक्षहून अधिक एकमेकांना जोडलेले सभासदांचे नेटवर्क असलेले 'लिंक्डईन' हे संकेतस्थळ विश्वासार्हक ओळखी वाढविण्यासोबत आपली माहिती, कल्पना तसेच नविन संधी एकमेकांना शेअर करण्याचे देखिल कार्य करते. अगदी मोफत असलेली ही सेवा आपण लगेच वापरु शकता. | |
' लिंक्डईन ' वर आपले खाते उघडण्याबद्दल
| |
' लिंक्डईन ' वर आपले खाते उघडणे फारच सोप्पे आहे. यांच्या www.linkedin.com पहिल्याच पानावर नविन खाते उघडण्यासाठी सोय आहे. | |
नविन खाते उघडण्यासाठी त्यांच्या वेबसाइट दिलेल्या वरील जागेमध्ये आपले नाव, आडनाव, ई-मेल आणि पासवर्ड देवून ' Join Now ' या बटणावर क्लिक केल्यास पूढे त्यांनी विचारलेली माहिती पूर्ण करीत आपण एकुण ६ टप्पे पार करता तेव्हा आपले खाते उघडले जाते. या ६ टप्प्यामध्ये एखादी माहिती आपण न भरल्यास अथवा काही माहिती नंतर भरली तरी चालते. अशाप्रकारे आपण साधारण ५-१० मिनिटांमध्ये आवश्यक ती माहिती भरुन देखिल आपले खाते उघडू शकता. | |
एकदा का आपण लिंक्डईन वर खाते उघडले की नंतर लिंक्डईनच्या वेबसाइटवरील साईन-इन बटणाद्वारे आपण आपल्या खात्यामध्ये प्रवेश करु शकतो. | |
आपला चालू तसेच मागिल नोकरीची माहिती, नविन ओळखी वाढविणे, आपला ग्रुप तयार करणे, नोकरी शोधणे, कंपन्यांची माहिती शोधणे तसेच प्रश्नांची उत्तरे मिळविणे अशा बर्याच उपयोगी गोष्टी इथे उपलब्ध आहेत.व्यवसायिक दृष्टीने तसेच नोकरी शोधण्याच्या तसेच आपल्या कंपनीसाठी कुशल कामगार शोधण्याच्या दृष्टीने 'लिंक्डईन ' फार उपयोगी वेबसाइट आहे. |
गुगल प्लस कसे वापराल?
| |
जुने तसेच नविन मित्रमैत्रिणी शोधणे, त्याच्याशी चॅट करणे, फोटो तसेच विडिओ शेअर करणे, ग्रिटींग पाठविणे, इतरांचे वाढदिवस लक्षात ठेवणे इ. सेवांसोबत या ' गुगल प्लस ' तीन नविन गोष्टी सुरु केल्या आहेत. ज्यामध्ये ' सर्कल (Circles) ' , ' स्पार्क्स (Sparks) ' , ' हॅगआऊट (Hangouts) ' हा नविन सेवा दिल्या आहेत. | |
गुगल प्लसवर आपले खाते कसे उघडाल? | |
टीप : आपणास ' गुगल प्लस ' चे निमंत्रण हवे असल्यास netshika@gmail.com वर संपर्क करावा. |
Subscribe to:
Posts (Atom)