ई लॉकर' सुविधा
कोणते डॉक्युमेंट्स ई लॉकरमध्ये ठेऊ शकता?
या लॉकरमध्ये आपण कोणत्याही प्रकारची कागदपत्रे ठेवू शकता. जसे जन्माचा दाखला (Birth Certificate), जातीचा दाखला (Cast Certificate), रहिवाशी दाखला (Residential), वैद्यकीय प्रमाणपत्र (Medical Certificate), शैक्षणिक प्रमाणपत्र इत्यादी सर्व महत्त्वाची कागदपत्र तुम्ही ई लॉकरमध्ये अपलोड करू शकता.
आपल्याला हवी ती कागदपत्रे आपण Upload करू शकतो अथवा कागदपत्रांची मागणी करताना संबंधित सरकारी कार्यालयात आपला आधार नंबर दिला असता soft copy आपल्या Locker मध्ये upload केली जाईल.
यासाठी तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे.
ई लॉकर सुविधा कशी वापरावी?
- elocker.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्या. इथे तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकून ‘साइन अप/लॉगिन’ करा.
- यानंतर तुम्ही आधार कार्डवेळी जो मोबाईल नंबर रजिस्टर केला आहे, त्या नंबरवर एक ‘वन टाइम पासवर्ड’ (ओटीपी) येईल. तो पासवर्ड अर्धातासापर्यंत वापरता येईल, अन्यथा परत लॉगिन करावं लागेल. हा पासवर्ड टाकून ‘व्हॅलिडेट ओटीपी’ वर क्लिक करा.
- या प्रक्रियेनंतर तुम्हाला 6 अंकी पिन तयार करावा लागतो. हा पिन कायमस्वरुपी असतो.
- तुम्ही तयार केलेला पिन टाकून ‘व्हॅलिडेट पिन’वर क्लिक करा. तुमचा ‘महा डिजिटल लॉकर’ तयार होईल.
- तुमच्या ‘महा डिजिटल लॉकर’वर तुम्ही तुमची महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करू शकता. त्यासाठी ‘अपलोड डॉक्युमेंट्स’वर क्लिक करा. त्यात विविध कागदपत्रांचे पर्याय आहेत. ही डॉक्युमेंट्स केवळ पीडीएफ, जेपीईजी, पीएनजी, बीएमपी किंवा जीआयएफ या फॉरमॅटमधीलच असावी लागतात.
महा ई लॉकरचा फायदा काय?
तुम्हाला कधीही, कुठेही तुमची महत्त्वाची कागदपत्रे, डॉक्युमेंट्स हवी असतील, तर त्यावेळी फक्त आधार नंबर दिल्यास, तुमच्या मोबाईल नंबरवर पासवर्ड येईल, तो टाकल्यास हवी ती कागदपत्रे download करता येतील.
No comments:
Post a Comment