नवीन ई-मेल खाते कसे उघडावे ?आपल्याला जर आपला नविन ई-मेल चालू करायचा असेल तर जी-मेल, हॉटमेल, याहू, रिडीफ या वेबसाइटवर नविन ई-मेल सुरु करण्यासाठी त्यांच्या वेबसाइटच्या पानावर तसे बटण आपल्याला पहायला मिळेल. जसे जी-मेलच्या वेबसाइटवरCreate an account, हॉटमेलच्या वेबसाइटवर Sign up, याहूच्या वेबसाइटवर देखिल Sign up आणि रिडीफच्या वेबसाइटवर Create a Rediffmail account असे दिलेले आहे. नविन ई-मेल बनविण्याच्या बटणावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक फॉर्म उघडेल. यामध्ये आपल्याला सुरुवातीला आपल्याला ज्यानावाने ई-मेल हवा असेल ते नाव द्यावे लागत. इथे आपण दिलेले नाव जर अधीच कुणी घेतलेले असेल तर ते नाव आपल्यालाच नाही तर जगभरामध्ये कुणालाच मिळत नाही. ई-मेल हा जगभर पसलेला असल्याने जगभरामध्ये एक ई-मेलचा पत्ता हा एकालाच दिलेला असतो. आपल्याला हवे असलेले उपलब्ध नाव निवडल्यानंतर त्याला उघडण्यासाठी पासवर्ड (सांकेतिक अक्षरे, उदा. कुणाचेही नाव) द्यावे तसेच त्याखाली आपली इतर माहिती भरुन दिल्या नंतर आपले ई-मेल खाते लगेचच चालू होते व आपण लगेचच इतरांना ई-मेल पाठवू शकता तसेच ई-मेल पाहू शकता. आपण जर आपला ई-मेल बनविलेला असेल तर आपल्याला ई-मेल पाहण्यासाठी तसेच ई-मेल पाठविण्यासाठी प्रथम आपल्या ई-मेल खात्यामध्ये प्रवेश करावा लागेल, ज्याला साईन इन (Sign In) करणे असे म्हटले जाते. आपण ज्या वेबसाइटवरुन ई-मेल बनविला असेल त्याच वेबसाइटवर आपण आपला ई-मेल पाहू शकतो. जसे जर आपल्या ई-मेलच्या पूढे @gmail.com असे असेल तर याचा अर्थ आपला ई-मेल जीमेल या वेबसाइटवर बनविला आहे वwww.gmail.com वेबसाइटवरच आपण आपले ई-मेल पाहू शकता. त्याच प्रमाणे जर आपल्या ई-मेलच्या पूढे @hotmail.com असे असेल तर याचा अर्थ आपला ई-मेल हॉटमेल या वेबसाइटवर बनविला आहे वwww.hotmail.com वेबसाइटवरच आपण आपले ई-मेल पाहू शकता. आपला ई-मेल असलेल्या वेबसाइटवर आपल्या ई-मेल तसेच ई-मेल बनविताना दिलेला पासवर्ड देऊन प्रवेश करु शकतो. योग्य प्रकारे चुक न करता आपला पूर्ण ई-मेल पत्ता आणि पासवर्ड दिल्यानंतरच साईन इन या बटणावर क्लिक केल्यानंतर आपण आपल्या ई-मेल खात्यामध्ये प्रवेश करु शकतो. | |
ALL Readers, या app/blog च्या माध्यमातून मी, Digital India करण्यासाठी ज्या माहितीची गरज आहे, ती माहित आपल्याला आपल्या बोली भाषेत देण्याचा प्रयत्न करतोय... आपल्याला नकीच आवडेन.....
Sunday, 11 September 2016
नविन ईमेल खाते कसे उघडावे?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment