Thursday, 22 September 2016

Malware...

Malware म्हणजे काय ?

Computer हानिकारक असलेला program.

जेव्हा ठराविक websites ना भेट देतात. म्हणजे जे मोफत Musics व movies Download करतात.
त्या वेळेस त्या file सोबत नको असलेली attachment file येते, व ते file तुमच्या computer System file ला हानी पोहचवतात.व computer slow चालतो. या Malware program मुळे computer च्या कामगिरी आणि विश्वसनीयतेवर गंभीरपणे विपरीत परिणाम होऊ शकतो.
आलेले malware काढणे शक्य आहे.
malware काढण्या साठी Norton Internet Security Antivirus program हा computer  मध्ये Install करावा.


लक्षात ठेवण्याचा गोष्टी.......


SisSoft Sandra utility software...



तुम्हाला तुमच्या computer बदल आवश्यक असलेली सर्व  माहिती पाहिजे असेल,तर त्या साठी 

SisSoft Sandra या utility software चा वापर करू शकता.

हि utility free version Download करण्यासाठी

या लिंक चा वापर करावा. http://www.sisoftware.net/

    • Easy "de facto" standard benchmarks for measuring performance.

    • Improve understanding of what is inside your computer.

    • Compare your system with refernce systems and results.

    • Check software configuration and settings and much more.

    • Designed especially for Home Users.

Tuesday, 13 September 2016

Cloud Storage...

Cloud Storage चा उपयोग कसा घेऊ शकतो...




Storage म्हंटले कि हा शब्द ओळकीचा वाटतो..पण Cloud हा नवीन, पण या दोन्ही शब्दांचे महत्व जाणून घेऊ,
प्रथम Cloud Storage म्हणजे काय ते पाहूया.Cloud Storage म्हणजे, आपल्या सिस्टम मध्ये किंवा एक्सटर्नल डिस्क मध्ये डेटा स्टोअर करण्याऐवजी ऑनलाइन सेव करणे.इंटरनेट वर अश्या अनेक साईट आहेत ज्या क्लाऊड स्टोरेज सेवा पुरवतात. या साईटवर आपल्याला एक खाते काढावे लागते मग युजरनेम व पासवर्ड तयार करावा लागतो. त्या मध्ये महत्वाची डॉक्यूमेंटस, फोटोज, वीडीओ अशी अतिशय महत्वाची माहिती तुम्ही यावर स्टोअर करू शकता.व जर तुम्हाला एखादी फाईल जर कुठे पाठवायची असेल तर फक्त एका क्लिक वर शेअर करू शकता.
पण जर तुम्हाल Mobile मध्ये याचा वापर करायचा असेल, तर या साठी उपयुक्त दोन mobile app आहेत,

1.Microsoft One Drive.

 या Cloud Storage app चा उपयोग करून 5gb Free Data Store केला जाऊ शकतो.

2.Dropbox.

 या Cloud Storage app चा उपयोग करून 2gb Free Data Store केला जाऊ शकतो.

Monday, 12 September 2016

सायबर क्राईम..


कोणतेही नवे तंत्रज्ञान अस्तित्वात आले की फायद्याबरोबर तोटेही येतात. तोट्यांवर मात करत जास्तीत जास्त फायदे कसे पदरात पाडून घ्यायचे हा विचार महत्त्वाचा ठरतो. संगणक तसेच इंटरनेटच्या क्षेत्राबाबतही असाच विचार गरजेचा ठरत आहे. अलीकडे सायबर सुरक्षितता ही गंभीर तसेच चिंताजनक बाब ठरत आहे. याचे कारण संगणकाच्या क्षेत्रातील वाढती गुन्हेगारी. गेल्या काही वर्षांत इंटरनेटद्वारे आर्थिक गैरव्यवहार, अश्लीलता आणि त्या संबंधी फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ दिसून येत आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगारीची माहिती मिळवणे तसेच त्याला तोंड देण्यासाठी सज्ज राहणे गरजेचे ठरत आहे.  हॅकर्स विविध उद्देशांसाठी सायबर गुन्हेगारीचा आधार घेत आहेत. त्यात मुख्यत्वे विविध बँकांमधील संबंधित खातेदाराची रक्कम आपल्या खात्यात वळवून घेणे, राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची आणि गोपनीय माहिती चोरणे तसेच एखाद्याला ब्लॅकमेल करण्यासाठी माहितीचा वापर करणे अशा पद्धतीच्या गुन्हेगारी कृत्यांचा समावेश होतो. अलीकडे सायबर गुन्हेगारीच्या घटना शहरी भागांबरोबर निमशहरी तसेच ग्रामीण भागातही दिसून येत आहेत. अशा वेळी संगणक वापरणार्‍यांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे ठरत आहे.

मोबाईल जर तुमचा पर्सनल बॉडीगार्ड झाला तर ?


फाईटबॅक

यात पाच जणांचे मोबाइल नंबर फिड करावे लागतात. एक पॅनिक बटण ठरवावं लागतं. ते बटण दाबल्यानंतर जे मोबाइल क्रमांक नोंदवले गेले आहेत त्या क्रमांकांवर तुम्ही असुरक्षित असल्याचं कळवलं जातंच पण त्याचबरोबर हे अँप फेसबुक चीही मदत घेतं. संबंधित क्रमांकाच्या फेसबुक अकौंटस्नाही कळवलं जात

मोबाईल जर तुमचा पर्सनल बॉडीगार्ड झाला तर?


मोबाइल पर्सनल सिक्युरिटी अँप्लिकेशन्स Sentinel...

सेंटीनेल
सेंटीनेल हे फक्त महिलांच्या सुरक्षिततेकरता तयार केलं गेलेलं अँप्लिकेशन आहे. यात तीन वेगवेगळ्या नोंदणी केल्या गेलेल्या मोबाइल नंबर आणि इमेल पत्त्यांवर संकटाच्या वेळी एसएमएस आणि इमेल जाते. इमेलमध्ये संकटात सापडलेली स्त्री नेमकी कुठं आहे याचा तपशीलवार पत्ताही दिला जातो. त्यामुळे संकटात सापडलेल्या तरुणीला मदत मिळणं शक्य होतं. सेंटीनेल हे मोफत अँप्लिकेशन आहे. फक्त एसएमएस आणि जीपीआरएस वापराचे जे काही पैसे मोबाइल प्लॅनमध्ये असतील तेवढाच खर्च या अँप्लिकेशन वापरासाठी होतो.

गुगल अ‍ॅलर्ट वापरून इंटरनेट जगतावर टेहळणी कशी करू शकतो...



गुगल अ‍ॅलर्ट वापरून इंटरनेट जगतावर टेहळणी

इंटरनेट वर प्रचंड प्रमाणात माहिती उपलब्ध असली तरी ब-याच वेळा आपल्याला हवी असणारी माहिती उपलब्ध होऊ शकत नाही. काही वेळा माहिती उपलब्ध होऊनही ती पुरेशी नसते. इंटरनेटवर प्रत्येक क्षणी कितीतरी पेजेस अपलोड होत असतात; पण आपल्याला हवी ती माहिती इंटरनेटवर पडल्याचे आपल्याला कसे कळणार? त्यासाठी गुगलने ‘गुगल अ‍ॅलर्टस्’ नावाची विशेष विनामूल्य सेवा दिली आहे. यासाठी http://www.google.com/alerts या लिंकवर जाऊन नोंदणी करा. ज्याबद्दल तुम्हाला अ‍ॅलर्ट हवाय तो मुद्दा, त्याचा प्रकार, दिवसातून किती वेळा अ‍ॅलर्ट पाठवावेत, कोणते पाठवावेत हे देऊन तुमचा जीमेल आयडी द्या. त्यानंतर तुमच्या ई-मेलवर गुगलकडून एक ई-मेल येईल, त्यात दिलेल्या लिंकवर क्लिक करा. यानंतर इंटरनेटवर पडलेल्या नवीनतम माहितीबद्दल ती इंटरनेटवर पडताक्षणीच तुम्हाला सूचित करण्यात येईल.

काय आहे महा ई लॉकर सुविधा ? ?


ई लॉकर' सुविधा


महाराष्ट्र सरकारने ‘महा ई लॉकर’ही नवी सुविधा उपलब्ध केली आहे. फक्त आधार कार्डद्वारे या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

कोणते डॉक्युमेंट्स ई लॉकरमध्ये ठेऊ शकता?

या लॉकरमध्ये आपण कोणत्याही प्रकारची कागदपत्रे ठेवू शकता. जसे जन्माचा दाखला (Birth  Certificate), जातीचा दाखला (Cast  Certificate), रहिवाशी दाखला (Residential), वैद्यकीय प्रमाणपत्र (Medical Certificate), शैक्षणिक प्रमाणपत्र इत्यादी सर्व महत्त्वाची कागदपत्र तुम्ही ई लॉकरमध्ये अपलोड करू शकता.
आपल्याला हवी ती कागदपत्रे आपण Upload  करू शकतो अथवा कागदपत्रांची मागणी करताना संबंधित सरकारी कार्यालयात आपला आधार नंबर दिला असता soft  copy  आपल्या Locker  मध्ये upload  केली जाईल.
यासाठी तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे.
ई लॉकर सुविधा कशी वापरावी?
  • elocker.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्या. इथे तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकून ‘साइन अप/लॉगिन’ करा.
  •  
  • यानंतर तुम्ही आधार कार्डवेळी जो मोबाईल नंबर रजिस्टर केला आहे, त्या नंबरवर एक ‘वन टाइम पासवर्ड’ (ओटीपी) येईल. तो पासवर्ड अर्धातासापर्यंत वापरता येईल, अन्यथा परत लॉगिन करावं लागेल. हा पासवर्ड टाकून ‘व्हॅलिडेट ओटीपी’ वर क्लिक करा.
  •  
  • या प्रक्रियेनंतर तुम्हाला 6 अंकी पिन तयार करावा लागतो. हा पिन कायमस्वरुपी असतो.
  •  
  • तुम्ही तयार केलेला पिन टाकून ‘व्हॅलिडेट पिन’वर क्लिक करा. तुमचा ‘महा डिजिटल लॉकर’ तयार होईल.
  •  
  • तुमच्या ‘महा डिजिटल लॉकर’वर तुम्ही तुमची महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करू शकता. त्यासाठी ‘अपलोड डॉक्युमेंट्स’वर क्लिक करा. त्यात विविध कागदपत्रांचे पर्याय आहेत. ही डॉक्युमेंट्स केवळ पीडीएफ, जेपीईजी, पीएनजी, बीएमपी किंवा जीआयएफ या फॉरमॅटमधीलच असावी लागतात.
महा ई लॉकरचा फायदा काय?
 तुम्हाला कधीही, कुठेही तुमची महत्त्वाची कागदपत्रे, डॉक्युमेंट्स हवी असतील, तर त्यावेळी फक्त आधार नंबर दिल्यास, तुमच्या मोबाईल नंबरवर पासवर्ड येईल, तो टाकल्यास हवी ती कागदपत्रे download  करता येतील.


Sunday, 11 September 2016

नविन ईमेल खाते कसे उघडावे?



नवीन ई-मेल खाते कसे उघडावे ? 


आपल्याला जर आपला नविन ई-मेल चालू करायचा असेल तर जी-मेल, हॉटमेल, याहू, रिडीफ या वेबसाइटवर नविन ई-मेल सुरु करण्यासाठी त्यांच्या वेबसाइटच्या पानावर तसे बटण आपल्याला पहायला मिळेल. जसे जी-मेलच्या वेबसाइटवरCreate an account, हॉटमेलच्या वेबसाइटवर Sign up, याहूच्या वेबसाइटवर देखिल Sign up आणि रिडीफच्या वेबसाइटवर Create a Rediffmail account असे दिलेले आहे.
नविन ई-मेल बनविण्याच्या बटणावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक फॉर्म उघडेल. यामध्ये आपल्याला सुरुवातीला आपल्याला ज्यानावाने ई-मेल हवा असेल ते नाव द्यावे लागत. इथे आपण दिलेले नाव जर अधीच कुणी घेतलेले असेल तर ते नाव आपल्यालाच नाही तर जगभरामध्ये कुणालाच मिळत नाही. ई-मेल हा जगभर पसलेला असल्याने जगभरामध्ये एक ई-मेलचा पत्ता हा एकालाच दिलेला असतो. आपल्याला हवे असलेले उपलब्ध नाव निवडल्यानंतर त्याला उघडण्यासाठी पासवर्ड (सांकेतिक अक्षरे, उदा. कुणाचेही नाव) द्यावे तसेच त्याखाली आपली इतर माहिती भरुन दिल्या नंतर आपले ई-मेल खाते लगेचच चालू होते व आपण लगेचच इतरांना ई-मेल पाठवू शकता तसेच ई-मेल पाहू शकता.
आपण जर आपला ई-मेल बनविलेला असेल तर आपल्याला ई-मेल पाहण्यासाठी तसेच ई-मेल पाठविण्यासाठी प्रथम आपल्या ई-मेल खात्यामध्ये प्रवेश करावा लागेल, ज्याला साईन इन (Sign In) करणे असे म्हटले जाते. आपण ज्या वेबसाइटवरुन ई-मेल बनविला असेल त्याच वेबसाइटवर आपण आपला ई-मेल पाहू शकतो. जसे जर आपल्या ई-मेलच्या पूढे  @gmail.com असे असेल तर याचा अर्थ आपला ई-मेल जीमेल या वेबसाइटवर बनविला आहे वwww.gmail.com वेबसाइटवरच आपण आपले ई-मेल पाहू शकता. त्याच प्रमाणे जर आपल्या ई-मेलच्या पूढे @hotmail.com असे असेल तर याचा अर्थ आपला ई-मेल हॉटमेल या वेबसाइटवर बनविला आहे वwww.hotmail.com वेबसाइटवरच आपण आपले ई-मेल पाहू शकता.
आपला ई-मेल असलेल्या वेबसाइटवर आपल्या ई-मेल तसेच ई-मेल बनविताना दिलेला पासवर्ड देऊन प्रवेश करु शकतो. योग्य प्रकारे चुक न करता आपला पूर्ण ई-मेल पत्ता आणि पासवर्ड दिल्यानंतरच साईन इन या बटणावर क्लिक केल्यानंतर आपण आपल्या ई-मेल खात्यामध्ये प्रवेश करु शकतो.